एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस; विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा

CM Eknath Shinde : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर केला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा केली. त्यांनी यावेळी विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या...

CM Eknath Shinde At Nagpur Winter Assembly Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधिमंडळात विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर केला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंनी ही घोषणा केली.  पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers)  याचा फायदा होणार आहे.  शेतकऱ्यांच्या थेट अकाऊंटला रक्कम पाठवली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,  विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत आहे. तसं महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ महत्वाचा आहे.  समृद्धी महामार्गामुळे मुंबई जवळ आणली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नागपूरला जवळ आणण्याचं काम केलं आहे. समृध्दीच्या वेळी आमच्याही आमदारांना विरोध करायला लावला. जमिनी देऊ नका म्हणून सांगण्यात आलं. समृध्दीमुळे सगळ्यांची समृध्दी झाली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमक्या काय घोषणा केल्या....

विदर्भातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामं सुरु आहेत 
बुलढाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.
गोसीखुर्द येथे 100 एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार आहोत. यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार असून, पीपीपी तत्वावर काम करण्यात येईल. लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल. निधीची तरतूद देखील करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 20 हजार कोटी गुंतवणुकीचा खनीज उत्खनन प्रकल्प सुरू होईल.   सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 755 कोटी रुपये निधी वितरित. अमरावती, नागपूर  पुणे विभागातील 14 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रुपये वितरित 
विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना.  70 हजार कोटीच्या  रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण 44 हजार 123 कोटी रुपयांची गुंतवणूक. 45 हजार रोजगार निर्मिती होणार
नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला सुधारित 9279 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली आहे.  वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी 1 हजार 96 कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. त्यानुसार 548 कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे. 
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर 

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री...

मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे केवळ वाहनांची ये-जा सुरु झालेला नाही. तर याचाच उपयोग करून घेऊन आम्ही विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार आहोत. एरव्ही संभाजीनगरहून नागपूर- अमरावती किंवा अगदी गडचिरोलीपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ लागायचा. विदर्भाचं म्हणून एक वेगळेपण आहे. खनीज, उर्जा, पाणी,वन, शेती ही विदर्भाची बलस्थानं आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहाल. याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झाली आहे, असं ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 31 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Embed widget