एक्स्प्लोर

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या अपत्यांना आईची जात लावण्याची संमती

नागपुरात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या आंचल बडवाईकने एक महत्त्वपूर्ण न्यायालयीन लढाई जिंकली. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या अपत्यांना आईची जात नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला

नागपूर : राज्यघटनेने स्त्री-पुरुषांना समान दर्जा बहाल केला असून आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याची अपत्यं स्वतःला आईची जात लागू करण्याची मागणी करु शकतात, अशा अपत्यांना आईची जात नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. 19 वर्षीय तरुणीच्या न्यायालयीन लढ्याला या निर्णयामुळे यश मिळालं आहे. नागपूरच्या गंजीपेठ परिसरात राहणाऱ्या भारती बडवाईक आणि त्यांची एकुलती एक मुलगी आंचल बडवाईक यांच्या चेहऱ्यावर सध्या समाधान दिसून येत आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या आंचलने एक महत्त्वपूर्ण न्यायालयीन लढाई जिंकली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आंचलचे वडील अनुसूचित जातीचे, तर आई इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहे. तिने आईच्या जातीची मागणी करुन जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला होता. मात्र पाल्याची जात वडिलांच्या जातीवरुन निर्धारित होत असल्याचं सांगत तिला वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश तिला जुलै 2017 मध्ये देण्यात आले होते. समितीच्या या आदेशाच्या निर्णयाविरोधात आंचलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. यावर निर्णय देत नागपूर खंडपीठाने पाल्याला जातीचे प्रमाणपत्र देताना त्याच्या आईची जात नाकारली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आंचल सुमारे एक वर्षाची असल्यापासून कुटुंबाला सोडून गेलेल्या तिच्या वडिलांचा आजवर पत्ता नाही. तेव्हापासून तिच्या आई भारती यांनीच हलाखीच्या परिस्थितीत, जमेल ते काम करुन आंचलचं संगोपन केलं. अभ्यासात हुशार असलेल्या आंचलला तिच्या गुणवत्तेच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळाला. तिच्याकडील सर्व कागदपत्रांवर वडिलांऐवजी आईचंच नाव आणि आईचीच जात होती. त्यामुळेच हलाखीची परिस्थिती असूनही आंचलला प्रवेश घेताना ओपन कॅटेगरीमधून प्रवेश घेऊन पूर्ण शुल्क भरावे लागले. आता उच्च न्यायालयाचा हा निर्णय आंचलला दिलासा देणारा तर ठरलाच आहे. सोबतच सिंगल मदर, पतीपासून विभक्त झालेल्या माता यांच्यासाठी हा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याचं कायद्याचे जाणकार सांगतात. पितृसत्ताक ही एक सामाजिक व्यवस्था असून ती देशात आजही अस्तित्वात आहे. आपल्या समाजाने मातृसत्ताक आणि मातृवंशीय पद्धत स्वीकारलेली नाही. परंतु हा परिवर्तनाचा काळ आहे. भारतीय राज्यघटनेत स्त्री-पुरुषांना समानतेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आजच्या समानतेच्या आणि लिंगावरुन भेदभाव नाकारणाऱ्या काळात समाजातील प्राचीन विचारधारा मान्य केली जाऊ शकत नाही आणि यापुढे त्या विचारधारेवर वाटचालही केली जाऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने या निर्णयात नोंदवलं आहे. जात पडताळणी समितीचा आदेश रद्द करुन आंचलला तिच्या आईकडील कागदपत्रं पडताळून सहा महिन्यात कायद्यानुसार सुधारित निर्णय घेण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पितृसत्ताक समाजात उच्च न्यायालयाचा हा आदेश नक्कीच दूरगामी ठरेल, हे निश्चित.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्त्र म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Embed widget