एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय चंद्रपुरातील मूल येथे उभारणार; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

Sudhir Mungantiwar : मूल येथे कृषी महाविद्यालय उभे करण्याची घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. हे महाविद्यालय राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे

चंद्रपूर : पारंपरिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आज शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. या सोबतच शेती विषयातील अत्याधुनिक शिक्षण घेत तरुणाई नव्याने शेती क्षेत्राकडे वळतांनाचे चित्र आहे. यांच उद्देशाने चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील  स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा आणि कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान तरुणांना मिळावे या उद्देशाने विशेष प्रयत्न राबविण्यात येत आहे. अकोला येथील  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मूल येथे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा संकल्प राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हे महाविद्यालय राज्यातील सर्वोत्कृष्ट राहणार असल्याची ग्वाही देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते.

फेब्रुवारी 2019 मध्ये मिळाली होती मान्यता

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास 28 फेब्रुवारी 2019 मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत 35 कोटी एवढे अनुदान विद्यापीठास वितरीत करण्यात आले. मूल-मारोडा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या उपलब्ध इमारतीमध्ये सन 2019-20 या सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून मॉडेल स्कूल, मूल येथे सदर महाविद्यालय भाडेतत्वावर स्थलांतरीत करण्यात आले. सन 2023-24 या कृषी शैक्षणिक सत्रात बी.एस.सी. (ऑनर्स) चे एकूण 189 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अशी माहिती देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

निधीची कमतरता पडू देणार नाही- सुधीर मुनगंटीवार

शेतात राबणारा शेतकरी अन्न पिकवितो, त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. कृषी आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. कृषी क्षेत्राचे बजेट 4 हजार कोटींवरून किमान 10 हजार कोटी असणे आवश्यक आहे.  त्यासाठी हा विषय मंत्रिमंडळात ठेवला जाईल. मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात शासकीय व खाजगी जागा येत्या 10 दिवसांत शोधून निर्णय घ्यावा. बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्यास मूल येथील कृषी महाविद्यालयासाठी वनविभागाची जमीन वळती करण्यासाठी 13 कोटी 48 लक्ष रुपये विशेष निधी भरण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय

भविष्यात कृषी महाविद्यालयात वाढणारी विद्यार्थी संख्या व त्या अनुषंगाने लागणारे प्रक्षेत्र, विविध युनीट, क्रीडांगण, नवीन इमारतीचे बांधकाम, विविध कार्यालये, वर्ग खोल्या, 17 कृषी  विषयाच्या विविध प्रयोगशाळा, मुला-मुलींचे वसतीगृह, रोजगार निर्मिती केंद्र, शेती प्रयोगाकरीता प्रक्षेत्र, प्रक्षेत्रावरील गोडावून आदींसाठी कृषी महाविद्यालयासाठी 40 हेक्टर आर मर्यादीत जमीन प्रस्तावित केलेली असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी वनजमीन वळतीकरण करण्यासंदर्भात तसेच विशेष निधी उपलब्ध होण्यासाठी नागपुरातील वनामती येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुनगंटीवार बोलत होते. 

महत्त्वाची बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
BJP second list: भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 26 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaBJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, कोणाकोणाला उमेदवारी?ABP Majha Headlines : 6 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सKishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
BJP second list: भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
Gopichand Padalkar : जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
BJP Candidate List : कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
BJP candidate list: भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
Embed widget