Nagpur Leopard: बिबट्याच्या भीतीनं नागपुरातील वाडी वस्त्यावर संध्याकाळी सहानंतर दार बंद; गावातील नागरिकांना खबरदारीचे मेसेज, दवंडीही पिटवली, चिमुरड्यांना घराबाहेर पडायला बंदी
Nagpur Leopard: महत्त्वाचं म्हणजे ठाकूर कुटुंब जवळपास बिबटचा वावर असल्याच्या भीतीने त्यांच्या घराचे दार बंद करून बसले होते. तर आजूबाजूचे नागरिकही बिबट दिसल्याच्या चर्चा नंतर भिती बाळगून आहे.

नागपूर: नागपुरात पारडी येथील शिवनगर भागात बिबट्याच्या (Nagpur Leopard) हल्ल्याच्या घटनेनंतर पावनगाव लगतच्या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहे. कारण गुरुवारी दुपारी पावनगावच्या रिवानगर परिसरात बिबट (Nagpur Leopard) दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला. आणि त्यानंतर परिसरातील नागरिक बिबटच्या भीतीत आहे. काल (गुरूवारी, ता ११) संध्याकाळ ६ नंतर रीवानगर भागातील सर्व सर्व नागरिकांनी त्यांच्या घराचे दार बंद करून स्वतःला एकाप्रकारे आत कोंडून घेतले होते. लहानग्यांना तर सुरक्षेच्या दृष्टीने घराच्या बाहेर जाण्याची परवानगीच नाही. त्यामुळे ग्रामीण भाग असल्याने एरवी संध्याकाळच्या जेवणानंतर रात्री आठ नऊ वाजेपर्यंत घराच्या बाहेर फिरणारे शेतकऱ्यांशी गप्पा मारणारे ग्रामीण काल (गुरूवारी, ता ११) संध्याकाळी सहानंतर घराच्या बाहेर पडलेच नाही.(Nagpur Leopard)
एबीपी माझाने पावनगाव मधील रीवानगर भागात जाऊन नागरिकांशी चर्चा केली, तेव्हा इथल्या ठाकूर कुटुंबातील एका चिमुकलीने आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास बिबटला घरा लगतच्या शेतात फिरताना पाहिल्याचा दावा समोर आला. त्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला याबाबत माहिती ही दिली. महत्त्वाचं म्हणजे ठाकूर कुटुंब जवळपास बिबटचा वावर असल्याच्या भीतीने त्यांच्या घराचे दार बंद करून बसले होते. तर आजूबाजूचे नागरिकही बिबट दिसल्याच्या चर्चा नंतर भिती बाळगून आहे. मुलांना घराबाहेर कसे सोडायचे, शाळेत कसे पाठवायचे असे प्रश्न इथल्या नागरिकांना पडण्याची पाहायला मिळाले. (Nagpur Leopard)
Nagpur Leopard: प्रत्येकाला पाठवले मेसेज, गावात दिली दवंडी
अंधारात विनाकारण घराबाहेर पडू नका. लहान मुलांनी संध्याकाळनंतर घरीच थांबावे. पावनगावमधील ग्रामपंचायतीने लोकांना सावध करत प्रत्येकाला मेसेज पाठवले आहेत, त्याचबरोबर गावात दवंडी देखील दिली आहे.नागपूरात पावनगाव मधील रिवानगर परिसरात बिबटची दहशत पसरल्यानंतर पावनगावच्या सरपंचांनी गावात दवंडी देत प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपवर संध्याकाळी उशिरा लोकांनी बाहेर पडू नये सकाळी लवकर एकटे बाहेर निघू नये असे मेसेज पाठवले आहे. पोलीस पाटलांनी सुद्धा पोलीस विभागाला बिबट दिसल्याची आणि त्यामुळे रिवा नगर मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची माहिती पोलीस विभागाला दिली आहे. लोकांनी काळजी घ्यावी स्वतःला सुरक्षित ठेवावं आणि अंधारात विनाकारण बाहेर पडू नये अशी सूचना गावातील प्रशासनाकडून नागरिकांना दिली जात आहे. विरळ वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरी सरपंच स्वतः जाऊन भेट ही देत आहे. गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.























