Prashant Koratkar : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कोरटकरचा बोगसपणा, मान्यता नसलेल्या विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवून मिरवायचा
Prashant Koratkar : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कोरटकरचा बोगसपणा, मान्यता नसलेल्या विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवून मिरवायचा

Prashant Koratkar : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आरोप लागलेल्या प्रशांत कोरटकर ची डॉक्टरेट वर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. प्रशांत कोरटकर सोशल माध्यमांपासून सर्वच ठिकाणी स्वत:ला पीएचडी प्राप्त डॉक्टर म्हणवत होता आणि आपल्या नावासमोरदेखील तो डॉ. असे लिहीतो. परंतु प्रत्यक्षात त्याने भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटी या एका खाजगी विद्यापीठाकडून मानद ‘डॉक्टरेट’ मिळविली असून त्या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचे समोर आले आहे..
मार्च २०२० मध्ये कोरटकरला भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर तो नावासमोर डॉक्टर लिहून लागला.. मात्र, कोरटकरने ज्या भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळविली आहे. विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळविण्याचे कुठलेही अधिकृत मापदंड नाहीत. यासाठी कुठलीही पात्रता परीक्षा होत नाही किंवा कुठलेही संशोधन तसेच संबंधित क्षेत्रात अत्युच्च दर्जाचे कामदेखील अपेक्षित नसते...भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीचे कार्यालय दिल्ली व बंगळुरू येथे आहे.
कोल्हापूर सेशन कोर्टाने प्रशांत कोरटकर यांना मोबाईल फोन आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना देण्याचे निर्देश दिले होते.. त्यानुसार आज प्रशांत कोरडकरच्या पत्नीने नागपूर सायबर सेलकडे मोबाईल फोन आणि त्याचा सिम कार्ड सुपूर्द किल्ल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे... मान्य असलेल्या प्रक्रियेचा पालन करून (sop नुसार) संबधित मोबाईल फोन आणि सिम कार्ड फॉरेन्सिक एक्सपर्ट च्या उपस्थितीत सील केले आहे... लवकरच ते कोल्हापूर न्यायालयाच्या सुपूर्त करू अशी माहिती ही सुतार यांनी दिली.. प्रशांत कोरटकर नागपूर सायबर सेल कडे त्यांचा मोबाईल फोन आणि सिम कार्ड सुपूर्द करतील अशी शक्यता वर्तवली जात असताना, आज संध्याकाळी कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी हा मोबाईल फोन सायबर सेल मध्ये आणून दिला... प्रशांत कोरटकर यांचे संमती पत्र घेऊन त्यांनी ते मोबाईल फोन पोलिसांच्या स्वाधीन दिला आहे... नागपूर पोलीस कोल्हापूर पोलिसांना हा मोबाईल फोन आणि सिम कार्ड पुढील तपासासाठी सुपूर्द करणार आहेत.. कोल्हापूर पोलिसात या मोबाईल फोनचा फॉरेनसिक आणि तांत्रिक तपास करणार आहे... त्यानंतरच या प्रकरणांमध्ये पुढचा खुलासा होण्याची शक्यता आहे....
इतर महत्त्वाच्या बातम्या
























