Nagpur Lok Sabha Election : काँग्रेसचं ठरलं! गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात; मात्र, ठाकरे निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत?
Nagpur Lok Sabha Election : नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र विकास ठाकरे हे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे बघायला मिळत आहे.

नागपूर : नागपूर लोकसभेसाठी (Nagpur Lok Sabha Election) काँग्रेसकडून (Nagpur Congress) उमेदवार कोण असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचे कारण म्हणजे देशभरात लोकप्रिय असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा तिसऱ्यांदा नागपुरातनं उमेदवारी मिळाली आहे. अशातच आता त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र विकास ठाकरे हे स्वतः सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे बघायला मिळत आहे. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर काल दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये नागपूर लोकसभेसाठी आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाला आहे. मात्र याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. असे असले तरी विकास ठाकरे नागपूरची निवडणूक लढायला फारसे उत्सुक दिसत नाही.
नागपूरच्या जेष्ठ नेत्यांनी मैदानात उतरायला हवे होतं, असं म्हणत विकास ठाकरे यांनी नाव न घेता नितीन राऊत, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी यांच्याकडे बोट दाखवलं आहे. मी स्वतः पेक्षा दुसऱ्यासाठी मैदानात उतरायला तयार होतो. मात्र, शेवटी पक्ष माझ्या नावाची घोषणा केल्यास मला पूर्ण ताकदीने मैदानात उतरावं लागेल, असं देखील विकास ठाकरे म्हणाले.
ठाकरे निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत?
मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम आम्हाला करायचे आहे. राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी हे तर राहणारच आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षश्रेष्ठींना विनंती केली होती की, सध्या घडीला मी विद्यमान आमदार असून माझी टर्म संपायला अद्याप सहा महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे माझ्याऐवजी योग्य उमेदवार द्यावा, अशी मागणी मी केली असून मी या लढतीत स्वतःला कधी उमेदवार समजलेच नसल्याचे विकास ठाकरे म्हणाले. माझं नाव जरी सुचवण्यात आले असलं, तरी अद्याप त्या संबंधित यादी प्रकाशित होणं बाकी आहे. त्यामुळे सध्या तरी त्यावर बोलणं उचित नाही. मात्र, उद्या पक्षाने आदेश दिलाच तर, मला पूर्ण ताकदीने मैदानात उतरावेच लागेल, असं देखील विकास ठाकरे म्हणाले.
नागपूर मतदारसंघात तगडी फाईट
मला कल्पना आहे, नागपूर सारख्या शहरात तगडी फाईट होऊ शकते. त्यामुळे आम्ही पक्षातील ज्येष्ठांनी ही निवडणूक लढावी यासाठी सुचवले होते. मात्र त्यावर त्यांनी माझंच नाव योग्य असल्याचं कळवल. त्यामुळे उद्या पक्षाने आदेश दिला तर मला किंवा जो कुठला उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आमचीच असणार आहे. यासाठी आम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी देखील केली आहे. मात्र पक्ष, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जर माझेच नाव सुचवलं तर पर्यायाने मला लढावेच लागणार असल्याचे देखील विकास ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या इतर बातम्या
Nagpur : नितीन गडकरींची जागा धोक्यात? नागपुरात काँग्रेसच्या सर्व गटांची दिलजमाई, उमेदवारही ठरला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
