Nana Patekar : राजकारणात अजातशत्रू कसा असावा याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी : नाना पाटेकर
Nana Patekar : अभिनेता नाना पाटेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. राजकारणात अजातशत्रू कसा असावा याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी असल्याचे पाटेकर म्हणाले.
Nana Patekar on Nitin Gadkari : राजकारणात अजातशत्रू कसा असावा याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी (Nitin Gadkari) असल्याचे गौरवोद्गार अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी काढले. नागपूरात शुक्रवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उदघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार सांस्कृतिक महोत्सव (MP Cultural Festiva Nagpur) म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं एक ठिकाण असल्याचेही पाटेकर म्हणाले.
नागपुरात शुक्रवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उदघाटन पार पडलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव होत आहे. या महोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. दरवर्षी नागपूरकरांसाठी ही सांस्कृतिक मेजवानीच असते. या महोत्सवाचे उद्धाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आल, यावेळी त्यांनी नितीन गडकरी असल्याचे गौरवोद्गार काढले. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील एक हजार स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर केली.
ऋतुचक्र बदललं, शेतकऱ्यांनी नेमकं कशाच्या आधारावर जगायचं हे कळत नाही
यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर काय करता येईल याचा विचार करायला हवा असे पाटेकर यावेळी म्हणाले. सरकार त्यांच्या बाजूने जे करायचे ते करत राहिल. मात्र आपल्याला काय करता येईल हे पाहायला हवं असे ते म्हणाले. ऋतुचक्र खूप बदललं आहे. शेतकऱ्यांनी नेमकं कशाच्या आधारावर जगायचं हे कळत नाही असेही पाटेकर म्हणाले. आपल्याकडे मार्केट तज्ज्ञ पाहिजे, कारण शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतल्यावर त्याला फायदा होईल हे कळायला हवे. ज्या दिवशी राज्यातील शेतकरी आत्महत्या करणं बंद करेल तेव्हा महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल असेही नाना पाटेकर म्हणाले.
जमिनीवर असल्यान पडण्याची भीती नाही
मी सामान्य आहे. याचाच मला आनंद असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. मला मोठं व्हायचा नाही. मी होणारही नाही. माझी मोठं होण्याची पात्रताही नाही. जमिनीवर असल्यानंतर पडण्याची भिती नसते, उंचावर गेल्यावर पडण्याचा धोका असतो, तो धोका मला नसल्याचे पाटेकर म्हणाले. यावेळी पाटेकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंबांना मदत करण्याचंही आवाहन केलं. ही एक आपली जबाबदारी असल्याचे पाटेकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: