एक्स्प्लोर

विदर्भातील गँगस्टर संतोष आंबेकरचा आलिशान बंगला जमीनदोस्त

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आंबेकर याचे प्रकरण सांगून त्यांचा अनधिकृत बंगला पडण्याची कारवाई अडकल्याचे सांगितले. तुकाराम मुंढे यांनी गेले अनेक आठवडे अडकलेली कारवाई लगेच करण्याचे आदेश दिले

नागपूर : विदर्भाचा स्वयंघोषित डॉन गँगस्टर संतोष आंबेकरच्या नागपुरातील अनधिकृत बंगल्यावर पालिकेचा हातोडा पडला आहे. यासाठी मोठा पोलीस फौजफाटा ही तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या ठोस पाठपुराव्यानंतर महापालिकेने कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त राजमाने आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची खास भूमिका आहे.

इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला कोट्यवधींचा बंगला आहे. त्याने अनेक गुन्हे याच ठिकाणी केल्याची चर्चा आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पोलिसांनी आंबेकर टोळी विरोधात कारवाई सुरू केल्यापासून त्याच्या दहशतीचा पर्याय ठरलेल्या हा बंगला पोलिसांकडून पाडला जाईल अशी चर्चा होती. मात्र, महापालिकेकडून पोलिसांना अपेक्षित साथ मिळत नव्हती.

नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे आंबेकर याचे प्रकरण सांगून त्यांचा अनधिकृत बंगला पडण्याची कारवाई अडकल्याचे सांगितले. तुकाराम मुंढे यांनी गेले अनेक आठवडे अडकलेली कारवाई लगेच करण्याचे आदेश दिले आणि आज महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे.

Nagpur Crime | नागपुरातील चहावाला स्वयंघोषित डॉन कसा झाला? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

नागपूरच्या इतवारी परिसरातला हा बंगला नुसता अनधिकृत नाही तर गेले दोन दशके नागपूरात दहशतीचा केंद्रबिंदू बनला होता. फक्त नागपूरचा नव्हे तर विदर्भाचा स्वयंघोषित डॉन संतोष आंबेकर येथेच राहून आपली गँग चालवायचा. 12 ऑक्टोबर रोजी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे संतोष आंबेकरला अटक करत त्याच्या विरोधात ठोस कारवाई सुरू केली. त्यानंतर संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळी विरोधात एका नंतर एक गंभीर तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या होत्या. यामध्ये धमकावणे, खंडणी मागणे, मारहाण करणे, बलात्कार करणे, अवैध सावकारी करणे, नोटा बदलून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांची फसवणूक करणे असे अनेक गुन्हे संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळी यांच्या विरोधात नागपुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

इतवारी परिसरात आंबेकर याचा बंगला पाडला जात आहे ही बातमी पसरताच नागरिकांनी गर्दी केली.बंगला प्रशस्त असल्याने पुढील दोन तीन दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंढे अन् नगरसेवकांमध्ये कलगीतुरा

 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय
खळबळजनक! नागपूरच्या कन्हान नदीपात्रात महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला; अपघात की घातपात? खबऱ्या म्हणून काम करणाऱ्या मित्रावर संशय
Nagpur Crime: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भातील बाळासह संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांचा खासगी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; नागपुरातील खळबळजनक प्रकार
Nagpur Congress Morcha: E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Embed widget