एक्स्प्लोर

Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

Nagpur Crime News: ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून ब्लिंकिटच्या दोन डिलिव्हरी बॉयनी आपल्या सहकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला (Nagpur Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली.

Nagpur Crime News: ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून ब्लिंकिटच्या दोन डिलिव्हरी बॉयनी आपल्या सहकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला (Nagpur Crime News) केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस (Nagpur Police) ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या (Nagpur Crime News) प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमीचे नाव आमीन मुस्तफा पठाण (वय 34) असून तो उंटखाना परिसरातील रहिवासी आहे. आरोपी केतन उरकुडे (वय 20) आणि श्रवण बारई (वय 20) हे दोघेही त्याच ब्लिंकिट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात.

Nagpur Crime News: वेळेत डिलिव्हरी करतो, चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानं काटा काढला

पोलिसांच्या माहितीनुसार, आमीन वेळेत डिलिव्हरी पूर्ण करत असल्याने कंपनीत त्याची चांगली प्रतिमा होती. त्याला इन्सेंटिव्ह ही मिळत होते. याच कारणावरून आरोपी त्याच्यावर नाराज होते. रविवारी सकाळी दोघांनी आमीनशी वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशातच रात्री मॉडेल मिल चौकात डिलिव्हरी करून परतत असताना एसटी महामंडळाच्या क्वार्टर्ससमोर आरोपींनी त्याची दुचाकी अडवून चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आमीनला स्थानिकांनी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

Nagpur Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि लैंगिक छळ प्रकरणी नवी माहिती समोर

नागपुरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निर्मय पाखरे प्रकृती अस्वास्थ्याचा कारण देऊन रुग्णालयात दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिथेही तो डॉक्टरांच्या उपचाराला सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. 3 ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी त्याला पीडित मुलीला दिघोरी परिसरातील एका भाड्याच्या घरात डांबून ठेवलेल्या अवस्थेत रंगेहाथ पकडले होते. सुरुवातीला आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. मात्र त्याने पोलीस तपासात कुठलेही सहकार्य केले नव्हते. या दरम्यान त्याने प्रकृती अस्वास्थ्याचा कारण पुढे केलं होतं. त्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, काल (6 ऑगस्ट) न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दुसऱ्या बाजूला आरोपीच्या ठाण्यातील घराची झडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक ठाण्याला रवाना झाले आहे. तर आरोपीच्या दोन्ही मोबाईलचा पासवर्ड मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आरोपी निर्मय पीडित मुली सोबत दिघोरी येथील ज्या भाड्याच्या खोलीत सापडला होता, ती खोली पोलिसांनी तात्पुरती सील केली असून त्या ठिकाणी फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. पोलिसांना घटनेच्या दिवशी तिथून तीन धारदार चाकू, बेल्ट, गुंगी आणण्याच्या गोळ्या, लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषध, चिटकवणारी टेप , हातमोजे आणि इतर काही धारदार वस्तू सापडल्या होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CET Scam Allegation : सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप 
Bribe Case : चांदीची अंगठी लाच म्हणून घेणं पडलं महाग! कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
चांदीची अंगठी लाच म्हणून घेणं पडलं महाग! कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Wrestler Ashwini Mohite Paul : लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती
Advertisement

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget