एक्स्प्लोर

नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंढे अन् नगरसेवकांमध्ये कलगीतुरा

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापलिका आयुक्त मुंढे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये वादावादी झाली. अनेक वर्ष अस्थायी सफाई कामगार म्हणून सेवा देणाऱ्या कामगारांना स्थायी करण्याच्या मुद्द्यावरुन ही खडाजंगी झालीय

नागपूर : महापालिकेत तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. महापालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचं कारण सांगून तुकाराम मुंढे यांनी अनेक प्रकल्पांच्या कामांना कात्री लावली आहे. तर, भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील कामं आयुक्तांनी बंद केल्याची ओरड सुरू केलीय. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा महापलिका आयुक्त आणि सर्वपक्षीय नगरसेवक समोरासमोर आले. या वेळेला मुद्दा होता महापालिकेत गेले अनेक वर्ष अस्थायी सफाई कामगार म्हणून सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना स्थायी करण्याचा. देवेंद्र फडणवीस सरकारने महापालिकेतील अस्थायी सफाई कामगारांना स्थायी करण्यासंदर्भात काही निकष निश्चित केले होते. त्यामुळे नागपुरातील 4 हजार 100 अस्थायी सफाई कमर्चाऱ्यांपैकी 1 हजार 800 सफाई कर्मचारी स्थायी करण्याच्या यादीत आले होते. त्या 1 हजार 800 कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या स्थायी सेवेत घेण्याचे तत्वतः ठरले होते. मात्र, तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने भूमिका बदलवत या 1 हजार 800 कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याबद्दल नकारात्मक भूमिका घेत महापालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचा कारण पुढे केला आहे. आज सभागृहात पुन्हा या अस्थायी कर्मचाऱ्याने स्थायी करण्याचा मुद्दा आल्यावर प्रशासनाच्या बदललेल्या भूमिकेबद्दल भाजप नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तुकाराम मुंढेंची शाळा, शिवजयंती कार्यक्रमात मोबाईल वाजल्याने जप्त तर जीन्स घातलेल्या कर्मचाऱ्याला झापले जे सफाई कर्मचारी गेले कित्येक वर्ष नागपूर शहर स्वच्छ ठेवण्याबद्दल मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यांना स्थायी दर्जा देण्यासाठीच तत्वतः निर्णय झालेला असताना प्रशासनाने भूमिका बदलविणे, महापालिकेच्या एकूण खर्चात वेतनाचा ( आस्थापनेचा ) खर्च 35 टक्क्यांच्या वर जाण्याचा मुद्दा समोर करणे योग्य नाही अशी भूमिका भाजपने घेतली. त्यांना इतर पक्षीय सदस्यांची ही साथ मिळाली. त्यानंतर या 1 हजार 800 अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांना येत्या दोन मार्चला, म्हणजेच महापालिकेच्या स्थापना दिनी स्थायी कर्मचारी म्हणून महापालिकेचा शेवट घेण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. आता या मुद्द्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये येणाऱ्या काही दिवसात कशी खडाजंगी होते. महापालिका खरोखरच या 1 हजार 800 कर्मचाऱ्यांना स्थायी म्हणून सेवेत स्वीकारते का हे पाहण्यासारखे असणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या पुढील सर्वसाधारण सभेत आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेच्या गेल्या 12 वर्षांच्या आर्थिक स्थितीसंदर्भात एक अहवाल मांडण्याची शक्यता आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात काँग्रेस नगरसेवकांची नाराजी UNCUT Speech | आयुक्त तुकाराम मुंढेंकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची शाळा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget