एक्स्प्लोर

नागपुरात प्रेयसीसमोरच प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या

सध्या व्हॅलेंटाईन सप्ताहाची सर्वत्र धूम सुरु आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी हे दिवस साजरे केले जातात. नागपुरात मात्र या सप्ताहात एक दुर्देवी घटना समोर आली आहे.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत चौदा मैल परिसरात प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांच्यात वाद झाला. या वादामुळे प्रियकर तरुणाने आपल्या प्रेयसीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 26 वर्षीय प्रणय मोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. चौदा मैल परिसरात एका भाड्याच्या घरात राहणारा प्रणय जवळच्या उड्डाण कंपनीत कामाला होता. तर त्याची प्रेयसी गेले काही दिवस उत्तरप्रदेशात लखनौला गेली होती. ती तिथून परत आल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी प्रणय आणि त्याची प्रेयसी दोघे चौदा मैल परिसरात प्रणय राहत असलेल्या भाड्याच्या घरात भेटले. मात्र, दोघांमध्ये एकमेकांवरील संशयावरून तेव्हा जोरदार भांडण झाले. त्यावेळी प्रणयने प्रेयसीच्या इतरांशी बोलण्याबद्दल आक्षेप घेत राग व्यक्त केला. याच मुद्द्यावर दोघांचे बराच वेळ वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात अचानकच प्रणयने गळ्यात तारेचा फंदा टाकून गळफास घेतला. त्याच्या प्रेयसीच्या त्याला वाचवण्याचे भरपूर प्रयत्न केले. मात्र, गळ्यात फास लावून पंख्याला लटकलेल्या प्रणयला उचलून धरण्यात ती अपयशी ठरली. यावेळी तिने शेजाऱ्यांना बोलावले, मात्र ते ही तिसऱ्या माळ्यावरील प्रणयच्या खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत प्रणय निपचित झाला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने प्रणयला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टर्सनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आज ( 13 फेब्रुवारी ) कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचे प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणारा प्रणय आणि त्याची प्रेयसी दोघे वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी होते आणि नोकरीच्या निमित्ताने नागपुरात राहत होते. सध्या व्हॅलेंटाईन सप्ताहाची सर्वत्र धूम सुरु आहे. मात्र नागपुरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रेमामध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या या वादात आज या युवकाला जीव गमावावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget