एक्स्प्लोर

Nagpur News : चिमुकल्याची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील डॉक्टरविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

नागपूर पोलिसांच्या सतर्कतेने काही महिन्यांपूर्वी बाळ चोरी प्रकरणात बाळ विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. यात आता आणखी प्रकरण समोर येत असून डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Child Sell Racket : लहान बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केला होता, त्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजले. पतीचा खून झाल्यानंतर विधवा महिलेचे एका नातेवाईकाशी सूत जुळले. या प्रेमसंबंधातून तिला गर्भधारणा झाली. ती गर्भपात करण्याच्या तयारीत असताना श्वेता सावळेच्या टोळीने तिची प्रसूती करून नवजात बाळाची परराज्यात पाच लाख रुपयांत विक्री केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या (Nagpur Police) मानवी तस्करी विरोधी पथकाने डॉक्टर, नर्ससह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोराडीमध्ये राहणारी 30 वर्षीय पीडित महिलेच्या पतीचा खून झाला. तेव्हापासून ती एकटी राहत होती. नातेवाईक असलेला विवाहित युवक तिच्या घरी यायला लागला. त्याची पत्नीसुद्धा प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यामुळे तोसुद्धा एकटा होता. त्यांचे सूत जुळले. दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  महिला गर्भवती झाली. ती सप्टेबर 2021 मध्ये आरोपी डॉ. नितेश मौर्य (37 रा.मनीष नगर, सोमलवाडा) याच्या रुग्णालयात गेली. तेथे रेखा पुजारी (रा. नारा रोड, निर्मल कॉलनी) या परिचारिकेने तिला विश्वासात घेतले. डॉ. मौर्य आणि रेखा यांनी या महिलेला नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख श्वेता सावळे ऊर्फ आयशा खान हिच्याकडे पाठविले. आयेशाचा पती मकबूल खान, दलाल सचिन रमेश पाटील यांनी तिला सूनेसाठी बाळ दत्तक घ्यायचे असल्याचे सांगून बाळाला जन्म देण्यास भाग पाडले. मार्च 2022 मध्ये आयेशाने या महिलेला बालाघाटमधील एका रुग्णालयात बळजबरी शस्त्रक्रिया बाळ काढले व अवघ्या दोन दिवसांच्या बाळाला परप्रांतात पाच लाखांत विकले.

गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी नवजात बाळांच्या विक्रीची माहिती गोळा केली. त्यात आयेशाच्या टोळीने आणखी बाळाची विक्री केल्याचे लक्षात आले. संकपाळ यांनी लगेच डॉ. सुनील मौर्य आणि रेखा पुजारी यांची चौकशी केली. रेखा हिने आयेशाच्या मदतीने बाळ विकल्याची कबुली दिली. 

आरोपी दाम्पत्याला मुलाचा ताबा

उपराजधानीतील बाळविक्री प्रकरणामधील आरोपी दाम्पत्य रिथिका व मनीष अग्रवाल यांना संबंधित मुलाचा ताबा देण्यात आला आहे. सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला. अग्रवाल दाम्पत्य कर्नाटक येथील रहिवासी आहे. राजश्री सेन (नागपूर) ही बाळविक्री प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. अजनी पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर तिने सोनू बांडबुचे (कुही) हिच्या मुलाला अग्रवाल दाम्पत्यास एक लाख रुपयांत विकल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अग्रवाल दाम्पत्य व सोनूचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. संबंधित मुलगा 15 महिने वयाचा आहे. पोलिसांनी त्या मुलाला श्रद्धानंद अनाथालयात ठेवल्यामुळे अग्रवाल दाम्पत्याने त्याचा ताबा मिळविण्यासाठी सुरुवातीला बालकल्याण समितीकडे अर्ज दाखल केला होता. 13 जानेवारी 2023 रोजी तो अर्ज खारीज करण्यात आला. परिणामी, अग्रवाल दाम्पत्याने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. संबंधित मुलाला सोनूच्या सहमतीने दत्तक घेतले असून 16 सप्टेंबर 2021 रोजी दत्तक करार करण्यात आला आहे. असा दावा त्यांनी न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने हिंदू दत्तक व निर्वाह कायदा, नोंदणी कायदा आणि बाल न्याय कायद्यातील तरतुदी लक्षात घेता, बालकल्याण समितीचा वादग्रस्त निर्णय रद्द केला व अग्रवाल दाम्पत्याकडे मुलाचा ताबा सोपविण्याचा आदेश दिला, अग्रवाल दाम्पत्यातर्फे अॅड. अतुल पांडे यांनी बाजू मांडली,

ही बातमी देखील वाचा...

नागपुरात 11 तृतीयपंथींवर खंडणीचा गुन्हा, 3 अटकेत; वसुलीच्या वाढत्या घटनांनंतर पोलीस अॅक्शन मोडवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget