एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

फुगा फुगवणं जीवावर, केळ्याचा घास जीवघेणा; नागपुरात दोन चिमुकल्यांचा अंत

फुग्याची टिचकुली एका मुलाच्या जिवावर उठली तर केळ्याचा घास मुलीसाठी जीवघेणा बनला.

नागपूर : लहान मुलं काय खातात, ते कोणत्या वस्तू तोंडात घालतात, याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची गरज आहे. कारण नागपुरात नुकत्याच घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन चिमुकल्याना जीव गमवावा लागला आहे. विश्वास बसणार नाही, अशा कारणांमुळे या लहानग्यांचे जीव गेले आहेत. फुग्याची टिचकुली एका मुलाच्या जिवावर उठली तर केळ्याचा घास मुलीसाठी जीवघेणा बनला. फुगा श्वासनलिकेत अडकला सानिध्य उरकुडे हा सहा वर्षीय मुलगा घराच्या आवारात फुग्यांनी खेळत होता. 25 जानेवारीला त्याने तीन फुगे खरेदी केली. दोन फुगे आईने फुगवून दिले. तर संध्याकाळी तिसरा फुगा फुगवण्याचा प्रयत्न केला. पण तो फुटलेला असल्याने त्याने फुग्यापासून छोटा फुगा बनवणं सुरु केलं. त्याच प्रयत्नात, जोरात श्वास घेतल्याने तो फुगा त्याच्या तोंडातून घशात गेला आणि श्वासनलिकेत अडकला. त्रास झाल्याने चिमुकल्या सानिध्यने घरात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. लहानपणी आपण सर्वांनीच हे असले प्रकार केले आहेत. पण ते किती जीवघेणे ठरु शकतात, हे या घटनेवरुन दिसतं. केळ्याचा घास जीवघेणा ठरला दुसरी घटनाही नागपुरातलीच आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर-भंडारा रोडवर पारडी परिसरात घडली. अडीच वर्षांची तिथी मिश्रा नेहमीप्रमाणे शेजारच्यांच्या घरी खेळायला गेली. घरात पूजा झाल्यावर त्यांनी प्रसादाचं केळं कुटुंबातील मुलांना आणि तिथीला खायला दिली. मात्र, केळ्याच्या आकाराचा आणि स्वतःच्या क्षमतेचा अंदाज न आल्यामुळे तिथीने ते केळं आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं. पण केळ्याचा तो घास तिच्या श्वासनलिकेत अडकला. तिथीचा त्रास पाहून शेजाऱ्यांनी तिच्या तोंडातून केळं काढण्याचा प्रयत्न केला. ते शक्य न झाल्याने त्यांनी तिथीच्या आई-वडिलांना याबाबत कळवलं. मात्र तोपर्यंत चिमुकल्या तिथीचा जीव गेला होता. या अनाकलनीय...अकल्पित...आणि अनपेक्षित घटनांनी या दोन्ही कुटुंबाची रयाच गेली आहे. दोन्ही कुटुंबांनी आपले काळजाचे तुकडे गमावले आहे. या बातमीने तुमच्या घरातल्या चिमुकल्यांबद्दलची तुमची काळजीही वाढली असेल याची कल्पना आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सतर्क करण्याचा हा प्रयत्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget