(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Development : एनएमआरडीएचा 1,350 कोटींचा प्रस्ताव मंजूर, मूलभूत सुविधांपासून वंचितांना मिळेल दिलासा
नवीन मंजूर योजनेंतर्गत 1,000 किमीपेक्षा अधिकची जलवाहिनी आणि सीव्हरेज लाइन टाकण्यात येणार आहे. या कामामुळे नवीन नागपूरची वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची तक्रार दूर होईल.
नागपूर: नागपूर मेट्रो रीजन डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएमआरडीए)ने 1,353 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता, नगर विकास विभागाने (Department of Urban Development) यापैकी 1,350 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गत अनेक वर्षांपासून थंडबस्त्यात पडून असलेल्या नवीन नागपूरची संकल्पना आता साकार होण्याची चिन्हे दिसून येत आहे. यात पाणी आणि सीव्हरेज लाइनसह दोन एसटीपी प्लांटची योजना आहे.
1,000 किमीची जलवाहिनी व सीव्हरेज लाइन
या योजनेंतर्गत 1,000 किमीपेक्षा अधिकची जलवाहिनी आणि सीव्हरेज लाइन टाकण्यात येणार आहे. या कामामुळे नवीन नागपूरची वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची तक्रार दूर होईल.
1,350 गावांना होणार लाभ
मागील काही वर्षांत नागपूर शहर सीमांचा (Nagpur City Limits) मोठा विस्तार झाला आहे. शहराला लागून असलेल्या बेसा, बेलतरोडी, पिपळा, बहादुरा, कामठी, कोराडी, वाडी, हिंगणा, बुटीबोरीपर्यंत लहान-मोठे शहर आणि गावांचा नागपूरमध्ये समावेश होत त्यांचे शहरीकरण झाले. त्यामुळे नवीन नागपूर संकल्पनेची चर्चा सुरू झाली. आता ही संकल्पना वास्तविकतेत साकार होण्याची चिन्हे दिसून येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन एनएमआरडीएची स्थापना केली होती. यात जवळपास 1,350 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रधान सचिवांनी घेतला आढावा
नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी नुकताच नागपूर क्षेत्राचा दौरा करून आढावा घेतला. शहराच्या विकासाबाबत सभासुद्धा घेतली. केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेंतर्गत नवीन मआरडीए सेक्टर साउथ बी मध्ये येणाऱ्या 13 आणि ए सेक्टरमध्ये येणाऱ्या 11 गावांच्या विकास कार्याला स्वीकृती देण्यात आली. या योजनेचा लाभ 81 चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना मिळेल.
योजनेंतर्गत होणारे कार्य
- साउथ बी सेक्टरमध्ये 565.25 कोटी रुपयांच्या जलवाहिनीचे जाळे पसरविले जाईल.
- साउथ बी मध्ये 220.90 कोटी तर साउथ ईस्टमध्ये 344.36 कोटींचा खर्च होईल.
- 788.89 कोटी रुपयांच्या सीव्हरेज लाइनची तरतूद.
- दोन एसटीपी प्लांट आणि 522 किमी सीव्हरेज लाइन. याअंतर्गत साउथ बी मध्ये 220 आणि ईस्ट ए मध्ये 302 किमीची सीव्हरेज लाइन टाकली जाईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या