एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नागपूरमधील हत्यांचे सत्र थांबेना, आज दोन हत्या, एक मंत्र्यांचा कार्यकर्ता

मानकापूर क्रीडा संकुलात आज ग्रामीण पोलीस दलाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असून त्या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. त्या क्रीडा संकुलापासून जवळ असलेल्या असलेल्या परिसरात हे हत्याकांड घडले आहे.

नागपूर : नवीन वर्षात नागपूर जिल्ह्यातील हत्या सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. कारण आज संध्याकाळी काही मिनिटांच्या अंतरावर जिल्ह्यात पुन्हा दोन हत्याकांड घडले आहे. पहिली घटना नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत झिंगाबाई टाकळी परिसरात घडली असून ललित खरे नावाच्या तरुणाची परिसरातील मराठी शाळेजवळ भोसकून हत्या करण्यात आली आहे. मद्यपान केल्यानंतर झालेल्या भांडणातून ही हत्या झाली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापासून जवळच असलेल्या मानकापूर क्रीडा संकुलात आज ग्रामीण पोलीस दलाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असून त्या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. त्या क्रीडा संकुलापासून जवळ असलेल्या असलेल्या परिसरात हे हत्याकांड घडले आहे. दुसरी घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर मध्ये घडली असून अंगद सिंह नावाच्या जिम संचालकाला सत्तूर / मोठा चाकू ने वार करून जीवे मारण्यात आले आहे.. ऑक्सिजन जिम चा संचालक असलेल्या अंगद सिंग वर आज रात्री 9 च्या सुमारास सावनेर मधील नागोबा मंदिर जवळ हल्ला झाला आणि त्याची क्रूरतेने हत्या करण्यात आली.. धक्कादायक बाब म्हणजे अंगद सिंह राज्याचे युवा कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा कार्यकर्ता होता. तो अनेक वेळेला त्यांच्या समवेत दिसायचा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं होमटाऊन असलेल्या नागपूरवर क्राइम कॅपिटलचं लेबल कायम असल्याचं दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सहा दिवसात नागपूर जिल्ह्यात हत्येच्या सहा घटना घडल्य. त्यामुळे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या होमटाऊन मध्येच गुन्हेगारांनी अक्षरश हैदोस मांडल्याचे चित्र आहे. हेही वाचा- नागपुरात स्वयंघोषित 'डॉन'ला पोलिसांनी धडा शिकवला, रस्त्याने 'वरात' काढली नागपुर जिल्ह्यात सहा दिवसात सहा हत्या  4 जानेवारी : नागपूर शहरातील अजनी परिसरात महेश पोरंडवार यांची डोक्यावर हातोडीने वार करून हत्या. हत्येच्या आरोपाखाली पत्नीला अटक 6 जानेवारी : कन्हान गावात स्थानिक शिवसेना नेत्याच्या नातेवाईकाची गौरव बारमध्ये हत्या. गुन्हेगारी वृत्तीच्या तीन आरोपींनी संजू खडसेला चाकूने भोसकून मारले 7 जानेवारी : नागपूर शहरातील कांजी हाऊस चौकात समीर शेख उर्फ बाबू या गुन्हेगाराची आर के सावजी या हॉटेलमध्ये सर्वांसमोर हत्या. परिसरातील गुन्हेगारांच्या दुसऱ्या टोळीने पाठलाग करुन आणि घेरून हत्या केली 7 जानेवारी : नागपूर शहरातील वाठोडा परिसरात गंगा सेलिब्रेशन हॉल समोर अनोळखी मजुराची काही स्थानिक गुन्हेगारांनी दगडाने ठेचून हत्या केली. 7 जानेवारी : नरखेड गावात विनोद नारनवरे यांना सिमेंट रस्त्यावर डोके आपटून आपटून जखमी केले गेले, नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 9 जानेवारी : काचूरवाही गावात शेतामध्ये अशोक वाडीभस्मे यांचे मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळले. संबंधित बातम्या  नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या  नागपुरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, मित्रांकडूनच तरुणीवर सामुहिक बलात्कार  मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 48 तासात तीन हत्या, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह  नागपुरात भर वस्तीत पाठलाग करुन महिला वकिलाची हत्या नागपुरातील बहुचर्चित भुपेंद्रसिंग हत्याकांडाचा पर्दाफाश, चार कुख्यात गुन्हेगारांना अटक  नागपुरात 'रॅश ड्रायविंग' करणाऱ्या गुंडाची नागरिकांनी मिळून केली हत्या  Nagpur Crime I नागपुरात कारचा हॉर्न वाजवला म्हणून एकाची हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?JOB Majha : जॉब माझा : भारतीय हवाई दल येथे विविध पदासाठी भरती : 26 Nov 2024Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?Zero Hour Pan Card : पॅन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी, नवा पॅन कसा असणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget