एक्स्प्लोर
Nagpur Crime I नागपुरात कारचा हॉर्न वाजवला म्हणून एकाची हत्या
नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असलेलं पाहायला मिळत आहे. काल रात्री केवळ हॉर्न का वाजवलं या क्षुल्लक कारणावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे.
नागपूर : कारचा हॉर्न का वाजवला एवढ्या कारणासाठी नागपुरात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. विजय खंडाईत, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विजय हे खासगी बियाणे कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
विजय खंडाईत हे काल रात्री (18 नोंव्हेंबर)ते त्यांच्या कारने घरी परतत होते. दरम्यान, राजाबक्षा मंदिराजवळ त्यांच्या कारसमोर चालणाऱ्या एका कारला त्यांनी हॉर्न वाजविला. एक दोनदा हॉर्न दिल्यानंतर अचानकच समोर चालणाऱ्या कारमधून यशवंत चव्हाण नावाचा इसम उतरुन आला आणि हॉर्न का वाजवतो अशी विचारणा करत विजय यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. विजय यांनी यशवंत चव्हाण यांच्या मग्रुरीला उत्तर देण्याचे प्रयत्न केले असता यशवंत चव्हाण याने त्याच्या कारमधून मोठा चाकू काढून आणला आणि विजय यांच्यावर वार करत त्यांना जीवे मारले.
भररस्त्यात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली. घटनेनंतर आरोपी यशवंत चव्हाण यांनी तिथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी विजय यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी यशवंत चव्हाण याच्यासह त्याच्या 2 सहकाऱ्यांना अटक केली आहे. फक्त साईड मिळवण्यासाठी समोरच्या कारला हॉर्न वाजविले एवढ्या शुल्लक कारणासाठी घडलेल्या हत्येच्या या घटनेने नागपुरात गुन्हेगारी कोणत्या स्तरावर गेली आहे याचा उलगडा होतोय.
संबंधित बातम्या :
नागपुरात स्वयंघोषित 'डॉन'ला पोलिसांनी धडा शिकवला, रस्त्याने 'वरात' काढली
नागपुरमध्ये केसांची चोरी, दोन चोरांना सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात अॅम्ब्युलन्सला खड्ड्यांमुळे उशीर, एकाचा मृत्यू
व्हिडीओ - Nagpur Crime | चिमुरडीला चिरडणाऱ्या कारचा शोध लागेना | स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement