शिवसेना बिहार निवडणूक लढवणार?
कोरोना संसर्गाचे आगमन झाल्यानंतर देशात पहिल्यांदाच बिहारमध्ये निवडणुका होत आहेत.यंदा शिवसेना बिहार निवडणूक लढवणार का? या महिना अखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणुका होत आहेत.
मुंबई : बिहारमध्ये जरी शिवसेनेची जास्त ताकद नसली, शिवसेना बिहारमध्ये निवडणुका लढवत आली आहे. यंदा शिवसेना ही निवडणूक लढवणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेससोबत आहे. त्यामुळे शिवसेना या निवडणुकीत एकटी जाणार की बिहारमध्ये पण इतर पक्षांसोबत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मुद्द्यावर सुरु झालेली संघटना हळुहळु हिंदुत्वांच्या मुद्द्यावर इतर राज्यातही पोहचू लागली. महाराष्ट्र जरी मुख्य केद्र असलं तर शिवसेना राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. याआधी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं कमी जागा लढवून चांगली मतं घेतली होती.
यंदा शिवसेना किती जागा लढवणार यावर सध्या पक्षात चर्चा सुरु आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी अनेकांचे प्रस्ताव आले आहेत. पण शिवसेना हिदुत्वाच्या मुद्द्यांवर कायम आहे त्यामुळे कोणत्याही पक्षांसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय.
बिहारमध्ये रंगणार घमासान
कोराना काळात देशातली पहिली निवडणुक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. बिहार विधानसभेत एकूण 243 मतदारसंघ आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6, सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015 च्या विधानसभा निडवणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. या निकालानंतर बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं. महाआघाडीचा घटक पक्ष जेडीयू भाजपसोबत गेला. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू मुख्य चेहरा आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल.
Bihar Election : कोरोना काळातील जगातील सर्वात मोठी निवडणूक बिहारची, 'या' आहेत गाईडलाईन्स
शिवसेनेचे नेते बिहारला जाणार?
शिवसेनेनं बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचं अंतिम केल्यानंतर संजय राऊत यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत हा शिवसेनेचा राष्ट्रीय पातळीवरचा चेहरा बनलाय. त्यांच्या साथीला प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाईंसह इतर लोकसभेतल्या खासदारांवर जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीत शिवसेनेला यश मिळत नसलं तरी हिदुत्त्वाच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त मतं खेचण्याचा सेनेचा प्रयत्न राहिल. बिहारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यींनी जोरदार तयारी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट बिहारचे सैनिक पाहत आहेत.
Bihar election 2020 | Sanjay Raut | बिहारमध्ये निवडणुकीसाठीचे सर्व मुद्दे संपले : संजय राऊत