Mumbai aircraft Crisis : नागपूरमधून टेकऑफ करताना एअर अॅम्ब्युलन्सचं चाक निखळलं, मुंबईत विमानतळावर सुरक्षित लँडिंग
नागपूरवरुन हैदरबादला निघालेल्या एका चार्टर विमानाचं (एअर अॅम्ब्युलन्स) पुढचं चाक रनवेवरच वेगळं झालं. त्यानंतर त्या एअर अॅम्ब्युलन्सचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आलं.
मुंबई : नागपूरवरुन हैदरबादला निघालेल्या एका चार्टर विमानाचं (एअर अॅम्ब्युलन्स) पुढचं चाक रनवेवरच वेगळं झालं. त्यानंतर त्या एअर अॅम्ब्युलन्सचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आलं. माहितीनुसार, एअर अॅम्ब्युलन्सच्या जेटसर्व एविएशनकडून ऑपरेट केल्या जाणाऱ्या या सी-90 एयरक्राफ्ट VT-JIL चं पुढचं चाक नागपूरच्या रनवे 32 वर उड्डाण करताना विमानापासून वेगळं झालं होतं. समोरचे चाक निखळल्यानंतरही सुरक्षितपणे मुंबईत विमानतळावर उतरवण्यात यश आले आहे.
या मेडिकल फ्लाईटमध्ये 2 क्रू मेंबर, एक डॉक्टर आणि एका रुग्णासह पाच लोक होते. मुंबई एअरपोर्टवर या नॉन शेड्यूल फ्लाईटचं लॅंडिंग करत उतरवलं गेलं. सर्व लोकांना मुंबईमध्ये आपत्कालीन लॅंडिंगनंतर सुरक्षित बाहेर काढलं आहे.
मुंबई एअरपोर्टकडून सांगण्यात आलं की, आज जेटसर्व एविएशन सी-90 एयरक्राफ्ट VT-JIL हे एम्ब्युलन्स फ्लाइटमध्ये रूग्ण घेऊन नागपुरहून मुंबईला निघाले होते. विमान उड्डाण घेत असताना धावपट्टीवर त्याचे चाक निखळले व ते विमानापासून वेगळे होऊन खाली पडले आणि विमान मुंबईच्या दिशेने गेले. या विमानात क्रू मेंबर शिवाय, रूग्ण व डॉक्टर देखील होते.
विमानाचे पायलट केशरी सिंग यांनी सांगितले की, त्यांना जाणवले की विमानाचे चाक निखळले आहे आणि लँडिंग करण्याअगोदर भरपूर इंधन जाळावे लागेल. मी बेली लँडिंग केलं, मला कल्पना नाही की यामुळे धावपट्टीचे काही नुकसान झाले आहे की नाही. ते पहावे लागेल. मी देवाचे आभार मानतो की सर्वजण सुरक्षित आहेत. केसरी सिंह यांनी समयसूचकता दाखवत अत्यंत कुशलतेने विमान मुंबईत लॅंड केलं.