एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवरील संभाषणाचा टीआरपी घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, अर्णब गोस्वामींचा हायकोर्टात युक्तिवाद

अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता हे केवळ चांगले मित्र, त्या दोघांमधलं संभाषण हे निव्वळ दोन मित्रांमधलची चर्चाटीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामींचा हायकोर्टात युक्तिवाद.अर्णब गोस्वामींच्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार?, मुंबई पोलिसांना लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

मुंबई : रिपब्लिक भारत या वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल म्हणजेच 'बार्क'चे माजी सीईओ पार्थो दासगुप्त हे चांगले मित्र होते. त्यामुळे दोन मित्रांमधील व्हॉट्सअॅपवरील संभाषणाचा टीआरपी घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, असा दावा गोस्वामी यांच्यावतीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णबसह एआरजी आऊटलेअर मीडियानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. टीआरपी घोटाळ्यातील दोषारोपपत्रातील सर्वात मोठा पुरावा कोणता? असा सवाल खंडपीठाने गोस्वामी यांचे वकिल अशोक मुंदरगी यांना विचारला. तेव्हा, त्यावर गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅपवरील गप्पा हाच पोलिसांकडे प्रमुख पुरावा असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. मुंदरगी यांनी यावेळी गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यामधील काही संभाषण कोर्टाला वाचूनही दाखवलं आणि दोघेही “शेअर बाजार”संबंधित चर्चा करीत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि हे संभाषण दोन जवळच्या मित्रांमधील असून त्याचा संबंध टीआरपी घोटाळ्याशी जोडू नये, असंही मुंदरगी यांनी कोर्टावा सांगितलं.

पार्थो दासगुप्ता यांनी गोस्वामीला मदत करण्यासाठी रिपब्लिकच्या बाजूनं टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स) वाढवण्यासाठी मदत केली का? अशी विचारणा खंडपीठाकडून करण्यात आली. त्यावर मुंबई पोलीस प्रकरण हाताळत असून त्यांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून मात्र हे सिद्ध होऊ शकलेले नाहीत, असा युक्तिवाद मुंदरगी यांनी केला.  पोलिसांनी यात अद्याप दोन आरोपपत्र दाखल केली असून त्यात गोस्वामी आणि एआरजीच्या कर्मचाऱ्यांना आरोपी म्हणून न दाखविता केवळ संशयित आरोपी दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हायकोर्टानं पोलिसांना अनिश्चित काळासाठी ही चौकशी करण्यापासून रोखावं आणि जोपर्यंत ही चौकशी प्रलंबित आहे, तोपर्यंत गोस्वामी आणि इतरांना अटकेपासून दिलासा द्यावा, अशी विनंती केली. मात्र, तपास विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, असा कायद्यानं कोणताही अधिकार न्यायालयाला दिलेला नाही. कारण, तपासाची प्रक्रिया ही तपास अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. मात्र, तपासाच्या नावाखाली राज्य किंवा केंद्रीय तपास यंत्रणा नागरिकांची छळवणूक करत असेल तर ते योग्य नाही असेही न्यायालयाने सोमवारी नमूद केलं.

व्हॉट्सअॅपचे मेसेज किती सुरक्षित?, हायकोर्टाचा सवाल

ही याचिका दाखल झाल्यापासून पोलिसांनी गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलावले का? अशी विचारणाही यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केली. त्यावर मुंदरगी यांनी नकारार्थी उत्तर देत आतापर्यंत एआरजीच्या 150 कर्मचार्‍यांना समन्स बजावण्यात आलं असून त्यातील पाच जणांची नावं अद्याप संशयित असल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे, व्हॉट्सअॅपमधील एनक्रिप्टेड (सुरक्षित मेसेज सेवा) सुरक्षित आहे का? अशी विचारणाही हायकोर्टानं केली. त्यावर संशयितांनी व्हॉट्सअॅपमधील संभाषण नष्ट केल्यास ते संभाषण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून परत मिळवू शकतो असा दावा राज्य सरकारकडून सरकारी वकिल दिपक ठाकरे यांनी केला. मग आपण व्हॉट्सअॅप एनक्रिप्टेड (सुरक्षित मेसेज सेवा) दावा करतो तो कशाच्या आधारावर? असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला. त्यावर पुढील सुनावणीदरम्यान आम्ही यावर आपली बाजू मांडू असे आश्वासन सरकारी वकिलांनी दिलं. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 25 मार्चपर्यत तहकूब केली. 

महत्त्वाच्या बातम्या

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget