एक्स्प्लोर
Advertisement
भारतमाला... महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय काय?
भारतमाला प्रकल्पाअंतर्गत देशभरात 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे.
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काल ‘भारतमाला’ प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला अनेक रस्ते येणार आहेत.
‘भारतमाला’ प्रकल्प काय आहे?
भारतमाला प्रकल्पाअंतर्गत देशभरात 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे.
‘भारतमाला’ प्रकल्पाचा ध्येय काय?
संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, देशाच्या सीमा आणि सागरी किनारपट्टी क्षेत्र (कोस्टल एरिया) इत्यादींमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातंर्गत अपूर्ण आंतराराष्ट्रीय प्रकल्पही पूर्ण करण्यात येणार आहेत.
‘भारतमाला’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?
- भारतमाला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्या महामार्गांची बांधणी करण्यात येणार आहे.
- यामध्ये देशाच्या सीमा, आतंरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचे विकासप्रकल्पांचाही समावेश आहे
- या प्रकल्पाअंतर्गत नवनवीन नॅशनल कॉरिडॉर्स उभारण्यात येतील.
- दुर्गम भाग आणि पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा नवे महामार्ग बांधले जातील.
- चारधाम, केदारनाथ,बद्रीनाथ, यमुदनोत्री, आणि गंगोत्री आदी धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येईल.
- पुणे
- नागपूर
- धुळे
- मुंबई (मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, रायगड जिल्हा)
- पुणे
- नागपूर
- नाशिक
- सोलापूर-अहमदनगर
- नागपूर-चंद्रपूर
- मुंबई-कोलकाता (1854 किमी) : मुंबई-ठाणे-नाशिक-औरंगाबाद-जालना-कारंजा-अमरावती-नागपूर-रायपूर-संभलपूर-देवगढ-खरगपूर-कोलकाता
- मुंबई-कन्याकुमारी (1619 किमी) : मुंबई-पनवेल-महाड-चिपळूण-पणजी-कारवार- भटकळ-उडिपी-मंगलोर-कन्नूर-कोझीकोड-कोचिन-अलापुझ्झा-कोल्लम-थिरुवनंतपुरम-नागरकॉईल-कन्याकुमारी
- अमृतसर-जमनानगर (1316 किमी) : अमृतसर-फरीदकोट-भटिंडा-अबोहर-श्री गंगानगर-बिकानेर-नागपूर-जोधपूर-राधनपूर-सम्खियाली-जमनानगर
- आग्रा-मुंबई (964 किमी) : आग्रा-ग्वाल्हेर-शिवपुरी-गुना-बियाओरा-देवास-इंदूर-सेंधवा-धुळे-मालेगाव-नाशिक-ठाणे-मुंबई
- पुणे-विजयवाडा (906 किमी) : पुणे-सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडा
- सुरत-नागपूर (593 किमी) : सूरत-बारडोली-धुळे-जळगाव-खामगाव-अकोला-अमरावती-नागपूर
- सोलापूर-नागपूर (563 किमी) : सोलापूर-लातूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूर
- इंदूर-नागपूर (464 किमी) : इंदूर-हरदा-बैतुल-नागपूर
- सोलापूर-बेल्लारी-गुटी (434 किमी) : सोलापूर-बिजापूर-कुश्तगी-होस्पेट-बेल्लारी-गुटी
- हैदराबाद-औरंगाबाद (427 किमी) : औरंगाबाद-जालना-नांदेड-देगलूर-संगरेड्डी-हैदराबाद
- सोलापूर-मेहबूबनगर (290 किमी) : पुणे-शिरुर-अहमदनगर-शनी शिंगणापूर-औरंगाबाद
- कराड-चिपळूण-जयगड पोर्ट मार्गात वाढ (150 किमी)
- दिघी पोर्टच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडण्यासाठी 92, 96 आणि 97 राज्य महामार्गांमध्ये सुधारणा (96 किमी)
- जेएनपीटीमधील राष्ट्रीय महामार्ग-4B, राज्य महामार्ग 54 आणि अमरा मार्गाच्या सहा पदरी रस्त्याचे 8 चं पदरीकरण (44 किमी)
- निवली ते जयगड मार्गाचं अपग्रेडेशन (42 किमी)
- सोनुर्ली ते रेडी पोर्ट (29 किमी)
- वधावन ते राष्ट्रीय महामार्ग 8 जोडणी (25 किमी)
- राष्ट्रीय महामार्ग 4 आणि 8 यांची जोडणी (20 किमी)
- राष्ट्रीय महामार्ग 4 चं कळंबोली ते मुंब्रा दरम्यान सहा पदरीकरण (20 किमी)
- राष्ट्रीय महामार्ग 4 चं चिंचवड ते जेएनपीटी दरम्यान विस्तारीकरण (10 किमी)
- जेएनपीटीमधील डीपीडब्ल्यू टर्मिनलमध्ये वाढ (5 किमी)
- जेएनपीटीमध्ये रेल्वे ट्रॅकवरुन फ्लायओव्हर (5 किमी)
- जेएनपीटीतील वाय जंक्शनवरुन फ्लायओव्हर (2 किमी)
- सोलापूर-औरंगाबाद
- नागपूर-नरसिंगपूर
- जळगाव (मुख्त्यारपूर)-इंदूर
- नाशिक-पुणे
- दौंड-अहमदनगर-शिरडी
- धुळे-औरंगाबाद
- नाशिक-वलसाड
- वर्धा-कारंजा
- नांदेड-निर्मल (राष्ट्रीय महामार्ग 44)
- हिंगोली-मेहकर
- आग्रा-मुंबई ते सूरत-नागपूर
- कडेगाव सातारा
- मालेगाव-शिर्डी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement