एक्स्प्लोर

Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग

Nashik Dwarka Flyover Accident : नाशिकमध्ये पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला.

Nashik Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडण्याच्या काही वेळा आधीच चारुदत्त दिनेश पवार या तरुणाने त्याच्या आईसोबत फोनवर संभाषण केले होते. मुलाचे आईसोबत फोनवर बोलून झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच हा अपघात झालाय. 

याबाबत मयत चारुदत्त दिनेश पवार याच्या काकू सोनाली नरेंद्र पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या की, काल निफाड येथे कार्यक्रमासाठी हे मुलं गेले होते. पिकअप ट्रकमध्ये सतरा-अठरा मुलं होती. आमच्या गल्लीतलेच हे सर्व मुलं होते. सगळे सोळा-सतरा वर्षाचेच मुलं आहेत. सगळ्यांचे आई-वडील खूप गरीब आहेत. या अपघातात माझ्या पुतण्याचा मृत्यू झाला. त्याची आई धुणेभांडे करून आपला उदरनिर्वाह करते. आम्हाला काय झालं काहीच कळालं नाही. फक्त अपघात झाला इतकीच आम्हाला माहिती मिळाली. सायंकाळी सहा वाजेला माझ्या पुतण्याचा त्याच्या आईला फोन आला. मुलगा म्हणाला मम्मी आम्ही जवळ आलो आहे. पंधरा ते वीस मिनिटात आम्ही घरी पोहोचतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर आम्हाला समजलं की अपघात झालाय, असे त्यांनी म्हटले. 

अपघातापूर्वीचे स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल

दरम्यान, नाशिकमधील अपघातात मृत्यू झालेली मुले सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होती. हे सर्वजण  निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. महिलांचा टेम्पो सुरक्षितपणे सह्याद्रीनगर येथे पोहोचला. मात्र, पुरुषांच्या ट्रकचा उड्डाणपुलावर द्वारका येथे भीषण अपघात झाला. या अपघाताच्या काहीवेळापूर्वी टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले होते. यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूला ही सर्व मुले गाण्यावर नाचत होती. काही मुले टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती. सर्वजण आनंदात होते. मात्र, पुढील काही क्षणांत त्यांच्यावर काळाने घाला घटल्याने नाशिकवर शोककळा पसरली आहे. 

आणखी वाचा 

Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
Nashik Crime News: घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
कळवण-नाशिक मार्गावर भीषण अपघात, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक, वाहतूक ठप्प 
कळवण-नाशिक मार्गावर भीषण अपघात, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक, वाहतूक ठप्प 
Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार
बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Maharashtra Budget 2026 Live Updates : अर्थसंकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Maharashtra Budget 2026 Live Updates : अर्थसंकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Pawar and Eknath Shinde: होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget