एक्स्प्लोर

काय आहे बदल्यांमागचं नेमकं राजकारण?

मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या अवघ्या 48 तासात रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. तर मागच्या दोन आठवड्यांपूर्वी MMR मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केलेल्या चार महापालिका आयुक्तांच्या बदल्या चर्चेचा विषय होत्या.या बदल्यांमागे नेमकी काय राजकीय समीकरणं दडली आहेत यावरुन राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मुंबई : महाविकास आघाडी सरकार समोर कोरोनाच्या संकटासोबतच आता राजकीय संकट गहिरं होत चाललंय असं दिसतंय. कारण मागच्या काही दिवसांपासून आघाडीत बिघाडी झाल्याची पुरेशी उदाहरणं समोर आली आहेत. त्यातलं सर्वात ताज उदाहरण म्हणजे बदल्यांवरुन सुरु असलेला घोळ. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या अवघ्या 48 तासात रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. तर मागच्या दोन आठवड्यांपूर्वी MMR म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या चार महानगरपालिका आयुक्तांच्या बदल्या चर्चेचा विषय होत्या. आता या बदल्यांमागे नेमकी काय राजकीय समीकरणं दडली आहेत यावरुन राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

काय आहे बदल्यांमागचं राजकारण? राज्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर मुंबईसह महानगर प्रदेशात वाढू लागला आहे. यामध्ये एकूण 9 महानगरपालिका मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, मीरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूरसमावेश यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपूर्वीच यापैकी चार महानगरपालिकेतील आयुक्तांची उचलबांगडी केली. खरंतर या महापालिकानगर विकास खात्याच्या अंतर्गत येत असल्याने संबंधित खात्याचे मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. मात्र तसं झालं नसल्याची ठाण्यात चर्चा आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल यांना शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी मानले जायचे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार त्यांची उचलबांगडी करुन विपीन शर्मा यांची नियुक्त्त करण्यात आली. त्यामुळे नाराज एकनाथ शिंदे बदल्या झाल्यानंतर काही दिवस एकांतात त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ गावी विश्रांतीसाठी निघून गेले होते. याला ठाण्यातल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं बोललं जातंय. मात्र त्यावेळीस मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे कानाडोळा केल्याने याची फार चर्चा झाली नाही.

शरद पवारांची मध्यस्थी आणि शिवसेनेची मनधरणी

पण दोन दिवसांपूर्वी मंबईत झालेल्या पोलीस आयुक्तांच्या बदल्यांना शिवसेनेच्या विभागप्रमुखांपासून ते खासदार-आमदारांपर्यंत होत असलेल्या विरोधाममुळे मुख्यमंत्र्यांना याची गंभीर दखल घ्यावी लागली. या बदल्या करण्यापूर्वी गृह मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मर्जीतला अधिकारी नसल्याने कोरोनासंदर्भातील उपाय योजना आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची अडचण होईल, असा तक्रारीचा सूर उद्धव ठाकरेंकडे या नेत्यांकडून आळवण्यात आला. यामुळे या बदल्यांना तात्काळ स्थगिती देण्यात आली. इतकंच नाही तर त्यानंतर शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचं बैठकीचं सत्र सुरु झालं.

या बदल्यांमुळे काय परिणाम होतील ? MMR म्हणजेच मुंबई महानगर परिसरात 9 महानगरपालिका, 15 नगरपालिका आणि 3 जिल्हे येतात. यामध्ये मुंबईचे 36, ठाण्याचे 24 आणि रायगडातील 2 असे एकूण 62 विधानसभा मतदारसंघ येतात. कोरोनामुळे नवी मुंबई महापालिका निवडणूक लांबणीवर पडली, तर कल्याण-डोंबिवली, वसई-विरार महानगर पालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी लागतील, तसंच मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पनवेल महानगर पालिकेच्या निवडणूका 2022 ला लागतील. यातील बहुतांश विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मागील पाच वर्षात भाजपने वर्चस्व वाढवलं असून शिवसेना नंबर दोनला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहेत. आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वात नियोजनबद्ध पद्धतीने पक्ष वाढीच्या कामाला लागल्याचे स्थानिक पातळीवर बोललं जातंय. राष्ट्रवादीला तीन नंबरवरुन दोन नंबरला यायचं असेल तर या MMR भागात प्रभाव वाढवणं गरजेचं. यासाठीच महापालिका आणि पोलिसांच्या बदल्यांवर आपली पकड मजबूत ठेवण्याचा दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताना दिसतोय. महत्वाचं म्हणजे या बदल्यांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध झाल्यानंतर शिवसेना नेतृत्त्व खडबडून जागं झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भविष्यात मुंबई महानगरात भाजपला मात द्यायची असेल आणि आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर शिवसेनेला या भागातील प्रशासकीय यंत्रणेवर आतापासूनच अंकुश ठेवणं गरजेचं आहे.

त्यासोबतच पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने आघडीतील बिघाडीला आणखी खतपाणी घालण्याचं काम झालं. हे प्रवेशही अजित पवार यांच्या उपस्थितीत झाल्याने शिवसेना नेतृत्वाला ही बाब रुचली नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच ते पाच नगरसेवक परत पाठवून द्या अशी मागणी शिवसेनेने अजित पवार यांच्याकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे.

अशात या धुसफुसीच्या वातावरणात भाजप कोरोनाच्या परिस्थितीवरुन मुख्यमंत्र्यांवर चहूबाजूंनी हल्ला चढवतेय. त्यात काही महिन्यात ठाकरे सरकार खाली खेचण्याच्या हालचालींची चर्चा सुरु ठेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची विरोधकांची रणनीती दिसतेय. यामुळे प्रशासनावर वचक न राहिल्याने राजकीय अस्थिरता महाविकास आघाडीला महागात पडू शकते. यासाठीच महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि मार्गदर्शक शरद पवार यांनी मागील दोन दिवसात बैठकांचा धडाका लावत डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केलीय. यामुळे काल मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बदल्यांवरुन निर्माण झालेला घोळ मिटवून समन्वय साधण्याचा प्रयत्न शरद पवार आणि मुख्यमंत्री यांयाकडून केला जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित बातम्या

CM Thackeray Meet | पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द, पवार, देशमुख, ठाकरेंमध्ये याबाबत चर्चा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget