Rain Updates : मुसळधार! मुंबई परिसरासह, कोकणातही धो-धो पाऊस, पुढील 3 ते 4 तास आणखी कोसळणार, हवामान विभागाचा इशारा
Mumbai Rains : मुंबई, ठाणे, पालघर सह सातारा आणि कोल्हापूर अशा बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Weather info Update : मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्यामुळे पुढील काही काळात मुंबईसह आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. मागील काही तासांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरु आहे. याशिवाय पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (Indian Metrological Department) दिला आहे.
यंदा काहीशी उशीरा पावसाला सुरुवात झाली असली तरी आता कोकण किनारपट्टी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सध्या मुंबईतील दादर, सायन, वरळी या शिवाय उपनगरीय भागात धो-धो पाऊस पडत आहे. ठाण्यापासून पुढे कल्याण तसंच अंबरनाथपर्यंत धुवांधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असून लोकल जवळपास 20 ते 30 मिनिटं उशीराने सुरु आहेत. वाशी, बेलापूर, खारघर, पनवेल परिसरात धुवांधार पाऊस कोसळत आहे. या सर्वामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली जाऊ लागले आहेत. वाढत्या पावसामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांना काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रातील बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाली असून आर्थिक राजधानी मुंबईतदेखील पावसाने जोर धरला आहे. त्यात मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरातील बऱ्याच भागात पाऊस पुन्हा जोमात सक्रिय होणार अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने नुकतीच दिली आहे. यामाहितीनुसार मुंबई परिसरासह कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ठाणे-डोंबिवलीतील पावसाची तासाभरातील आकडेवारी
डोंबिवली (पश्चिम) - 42.6मिमी
विठ्ठलवाडी - 23.4 मिमी
आधारवाडी - 20.4 मिमी
ठाणे परिसर
ढोकाळी - 29.4 मिमी
कोपरी - 24.5 मिमी
ऐरोली गाव - 29.2 मिमी
शेतीच्या कामांना वेग
कोकणातही जोरदार पाऊस सुरु असून समोर आलेल्या माहितीनुसार चिपळूणमध्ये पावसाची जबरदस्त बॅटींग सुरु आहे. याच पावसामुळे चिपळूणच्या सखल भागात पाणीच पाणी साठले आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात सातारा, आणि कोल्हापूर भागातही पाऊस सुरु असून या सर्व ठिकाणी पाऊस आणखी वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरुच आहे. या सर्वामुळे या भागांमध्ये शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.
हे ही वाचा :
- Maharashtra Rains : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, 4 जुलैपासून कोकणासह विदर्भात मुसळधार
- Parashuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद; दरड खाली आल्याची माहिती
- Monsoon News : जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, उद्यापासून पावसासाठी पोषक वातावरण