एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jilha Parishad Election | राज्यातील 6 जिल्हा परिषदांसाठी महाआघाडी-भाजप आमने-सामने
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा परिषदांसाठी महाआघाडी आणि भाजप आमने-सामने आहेत. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
मुंबई : राज्यातील 6 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान होत आहे. यात नागपूर, वाशिम, अकोला, धुळे, पालघर आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. राज्याच्या सत्तेत आकारास आलेल्या महाविकास आघाडीमुळे देवेंद्र फडणवीसांची चिंता वाढली आहे. परिणामी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रमुख लढत असणार आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी बनवत भाजपला धक्का देत राज्यात सरकार स्थापन केलं. राज्याप्रमाणेच ही महाआघाडी आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आघाडी करताना दिसत आहे. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक जिल्हा परिषदा महाआघाडीने ताब्यात घेतल्या. परिणामी आता महाविकास आघाडी आणि भाजपचा थेट सामना होत आहे.
नागपूर -
नागपूर हा भाजपचा बालेकिल्ली मानला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्यातून येत असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. फडणवीस यांनीही जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकासाठी मतदान होत असून ग्रामीण जनता मोठ्या संख्येने मतदान करायला येत आहे. नागपूर जिल्ह्यात एका बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसऱ्या बाजूला गृह मंत्री अनिल देशमुख तसेच पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांची प्रतिष्ठा ही नागपूर ग्रामीण मधील या निवडणुकित पणाला लागली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नाव -
नागपूर जिल्हा परिषद
नरखेड पंचायत समिती
काटोल पंचायत समिती
कळमेश्वर पंचायत समिती
सावनेर पंचायत समिती
पारशिवनी पंचायत समिती
रामटेक पंचायत समिती
मौदा पंचायत समिती
कामटी पंचायत समिती
नागपूर(ग्रा)पंचायत समिती
हिंगणा पंचायत समिती
उमरेड पंचायत समिती
कुही पंचायत समिती
भिवापूर पंचायत समिती
धुळे -
जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. मात्र, यावेळी काँग्रेस महाआघाडीतून निवडणूक लढवत आहे. जिल्ह्यात एकूण 56 गट असून त्यापैकी 5 बिनविरोध निवडून आल्याने आता 51 जागांसाठी मतदान होत आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगेवरुन मतदारांचा उत्साह जाणवत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नाव -
धुळे जिल्हा परिषद
शिरपूर पंचायत समिती
सिंदखेडा पंचायत समिती
साक्री पंचायत समिती
धुळे पंचायत समिती
नंदूरबार -
विजयकुमार गावित आणि हिनाकुमार गावित यांच्यामुळे भाजपने नंदूरबार जिल्ह्यात चंचुप्रवेश केला आहे. मात्र, आता राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने गावितांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. नंदूरबारमध्ये महाविकास आघाडीचे पारडं सध्यातरी जड आहे. जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 359 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नाव -
नंदुरबार जिल्हा परिषद
अक्कलकुवा पंचायत समिती
अक्राणी पंचायत समिती
तळोदा पंचायत समिती
शहादा पंचायत समिती
नंदुरबार पंचायत समिती
नवापूर पंचायत समिती
अकोला -
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार की आंबेडकर सत्ता राखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नाव -
अकोला जिल्हा परिषद
तेल्हारा पंचायत समिती
अकोट पंचायत समिती
बाळापूर पंचायत समिती
अकोला पंचायत समिती
मुर्तीजापूर पंचायत समिती
पातूर पंचायत समिती
बार्शीटाकळी पंचायत समिती
वाशिम -
वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सहा पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यात 852 मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 52 जागांकरिता 267 तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांकरिता 473 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नाव -
वाशिम जिल्हा परिषद
मालेगाव पंचायत समिती
मंगळूरपीर पंचायत समिती
कारंजा पंचायत समिती
मानोरा पंचायत समिती
वाशिम पंचायत समिती
रिसोड पंचायत समिती
पालघर -
पालघर जिल्ह्यात पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या 114 जागांसाठी 434 उमेदवार नशिब आजमावणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 10 लाख 44 हजार 888 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि बहुजन विकास आघाडी हे महाआघाडी करुन रिंगणात उतरले आहे.
संबंधित बातमी - देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला सरकारचा ब्रेक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement