एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वरांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल
मुंबई: मुंबईत महापौर आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. महापौरपदासाठी विश्वानाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांची नावं निश्चित झाली आहेत.
'मातोश्री'वर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर आणि वरळीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर आणि हेमांगी वरळीकर यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.
विश्वनाथ महाडेश्वर यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द:
शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे आतापर्यंत महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. पहिल्या टर्ममध्ये ते शिक्षण समितीचे चेअरमन होते. तर नंतर पाच वर्ष ते स्थायी समितीत होते. तर 2012 साली त्यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर या निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्व येथील वॉर्ड क्रमांक 87 मधून त्यांनी भाजपच्या महेश पारकर आणि काँग्रेसच्या धर्मेश व्यास यांचा पराभव केला. राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे ते प्राचार्यही होते.
हेमांगी वरळीकर यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द:
हेमांगी वरळीकर यांची नगरसेवक पदाची ही दुसरी टर्म आहे. याआधी त्यांनी शिक्षण समितीचं महापौरपद भूषवलं होतं. वॉर्ड क्रमांक 193 मधून त्या यंदा निवडून आल्या आहेत.हेमांगी वरळीकर यांनी यावेळी भाजपच्या जयंत नटे आणि काँग्रेसच्या अतित मयेकर यांचा पराभव केला.
दरम्यान, मुंबई महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक भाजप लढवणार नसल्याने शिवसेनेचा महापौर आणि उपमहौर होणार, हे निश्चित झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement