एक्स्प्लोर
शिवमय नव्हे भाजपमय, शिवस्मारकाच्या कलशयात्रेवर मेटे नाराज
मुंबई : शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रात जय्यत तयारी सुरु आहे. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे काहीसे नाराज आहेत. शिवस्मारकाच्या कलशयात्रेतून मेटेंनी काढता पाय घेत भाजपवर टीका केली आहे.
शोभायात्रा सुरु होण्यापूर्वी विनायक मेटे चेंबूरमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, मात्र त्यांनी शोभायात्रेत सहभागी होणं टाळलं. कलशांची शोभायात्रा म्हणजे भाजपचं निव्वळ शक्तीप्रदर्शन असल्याची नाराजी विनायक मेटेंची व्यक्त केली. कलशांची शोभायात्रा म्हणजे वर्चस्वाची लढाई बनली आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केलं जात असल्याचा थेट आरोप विनायक मेटेंनी केला.
'हा कार्यक्रम महाराजांच्या सन्मानासाठी नाही तर केवळ शतप्रतिशत भाजप हा अजेंडा राबवण्यासाठीच दिसत आहे. वातावरण शिवमय वाटण्याऐवजी भाजपमय वाटत आहे, या शब्दात विनायक मेटेंनी भाजपवर ताशेरे ओढले.
कलशयात्रेमधे चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार असे भाजपचे दिग्गज नेते-मंत्री सहभागी झाले आहेत. मात्र विनायक मेटेंनी शोभायात्रा कार्यक्रम अर्ध्यात सोडून जाणं पसंत केलं.
संबंधित बातम्या
'शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा' शिवसेनेची पोस्टरबाजी
शिवस्मारकासाठीच्या जल-माती कलशाची मुंबईत शोभायात्रा
VIDEO : असं असेल अरबी समुद्रातील शिवस्मारक!
शिवस्मारकासाठी कोणत्या जिल्ह्यातून काय आणलं?
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अरबी समुद्रात फक्त हे सहा जण उतरणार!
शिवस्मारकाच्या भूमीपूजनापूर्वी 23 डिसेंबरला भव्य शोभायात्रा
शिवरायांचा पुतळा बनवायला मिळणं भाग्य समजतो : राम सुतार
शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी भाजपचा गाजावाजा
मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement