एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

वसई, विरारमध्ये सीरिअल रेपिस्टची दहशत, नागरिकांचा 'जागते रहो'चा पहारा

मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना या नराधमाने आपली शिकार बनवलं आहे.

वसई : वसई आणि विरारमध्ये सध्या नागरिक दहशतीखाली आहेत. अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरिअल रेपिस्ट आता वसई, विरारमध्ये दाखल झाला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना या नराधमाने आपली शिकार बनवलं आहे. सीरिअल रेपिस्ट वसई, विरार आणि नालासोपारा या भागात दाखल झाला आहे.  नालासोपाऱ्यात चार दिवसात दोन मुलींना त्याने आपली शिकार बनवलं आहे. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सदर घटनेने परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे.  नागरिकांनी आता स्वतःच ‘जागते रहो’चा नारा दिला आहे. रात्रीच्या अंधारातही हातात काठी घेऊन पालक पहारा देत आहेत. या घटनेचं वृत्त समोर आल्यापासूनच नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. हा वासनांध नराधम 25 ते 35 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. हा नराधम 9-14 वर्षे वयोगटातील लहान मुलींवर पाळत ठेवतो. मुलींच्या मागे जातो, तुझ्या वडिलांनी मला तुला घ्यायला पाठवलं आहे, तुझ्या वडिलांचं पार्सल आलं आहे, अशा बतावण्या करून मुलींना सोबत घेऊन जातो. मुलींना निर्जनस्थळी नेऊन हा नराधम अतिप्रसंग करतो. सध्या त्याच्यावर नवी मुंबईत सहा, मुंबईत एक, ठाणे शहर येथे एक, ठाणे ग्रामीण येथे दोन, तर पालघर जिल्ह्यात दोन घटना घडल्या आहेत. चार दिवसात पालघर जिल्हयातील तुलिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीवर या नराधमाने बलात्कार केला आहे. तर दुसरी या नराधमाच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी झाल्याने तिचा विनयभंग केला आहे. नालासोपारा येथे दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हातात काठी घेऊन नागरिक स्वतः पहारा देत आहेत. आळीपाळीने टीम करून, ही मंडळी सध्या आपल्या परिसरात पाळत ठेवणार आहेत. अनोळखी दिसणाऱ्या व्यक्तींची चौकशीही केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget