एक्स्प्लोर

सोशल मीडिया पोस्टवरून गुन्हे दाखल करत जाणं योग्य आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

केतकी चितळेच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

Mumbai : तुमच्या या कारवाईनं पद्मविभूषण या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेल्या शरद पवारांच्या नावालाही गालबोट लागेल. एका विद्यार्थ्याला अशा प्रकारे तुरुंगात डांबणं हे पवारांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वालाही आवडणार नाही, असा शब्दांत हायकोर्टानं राज्य सरकारचे कान टोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जवळपास महिनाभर अटकेत असलेल्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्याच्या याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडेबोल सुनावले.

दररोज शेकडो आणि हजारो ट्विट केली जातात. मग तुम्ही प्रत्येक ट्विटची दखल घेणार आहात का? आम्हाला अशा प्रकारच्या एफआयआर नको आहेत, असं स्पष्ट मत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला असं जवळपास महिनाभर कारागृहात डांबून ठेवणं योग्य ठरणार नाही. त्याच्या या याचिकेला विरोध न केल्यास एका होतकरू तरुणाला वाईट मार्गापासून परावृत्त होण्यास प्रोत्साहन मिळेल, असंही यावेळी हायकोर्टानं नमूद केलं.

काय आहे प्रकरण?

नाशिकमधील रहिवासी निखिल भामरे या फार्मासिस्ट तरुणानं पवारांविरोधात सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्याचे ‘बागलाणकर’ या नावानं अकाऊंट आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यानंतर, ठाण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरेविरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि 18 मे रोजी त्याला अटक करण्यात आली. नाशिक, ठाण्यासह अन्य ठिकाणीही भामरेविरोधात गुन्हे नोंदविण्यात आलेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका भामरेच्यावतीने हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. एम. जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. 

केतकी चितळेच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी

अश्याच एका अन्य प्रकरणी मराठी कलाकार केतकी चितळेलाही अटक करण्यात आली असून तिनंही तिच्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तिच्या याचिकेवर बुधवारी युक्तिवाद होणार आहे. 

संबंधित बातम्या

Ketaki Chitale : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

Ketki Chitle : केतकी चितळे पुन्हा अडचणीत, फेसबुक पोस्ट पडणार महागात

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget