एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी?

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून जवाबदारी उत्तम रित्या पार पाडली आहे. त्यामुळे आता नार्वेकरांना नवीन जबाबदारी मिळाल्यास ते किती उत्तम रित्या हाताळतील याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांवर ओएसडी म्हणजे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती होऊ शकते. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून जवाबदारी उत्तम रित्या पार पाडली आहे. त्यामुळे आता नार्वेकरांना नवीन जबाबदारी मिळाल्यास ते किती उत्तम रित्या हाताळतील याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तमाम जनतेला वंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता | ABP Majha कोण आहेत मिलिंद नार्वेकर? मिलिंद नार्वेकर हे एक शिवसैनिक होते. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. 1992च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला. नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने नार्वेकरांनी मातोश्री गाठली. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मिलिंद नार्वेकर हे शाखाप्रमुख होण्यासाठी मुलाखत देण्याकरिता उद्धव यांना पहिल्यांदा भेटले. हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा नार्वेकरांमधील चमक पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद नार्वेकरांना पटकन उत्तर दिलं तुम्ही सांगाल ते. तेव्हापासून नार्वेकर हे सावलीसारखे उद्धव यांच्यासोबत आहेत. साधारण 1994 सालच्या उत्तरार्धात मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले. संघटनेत महत्त्वाची पदे उद्धव यांच्या विश्वासू व्यक्तींकडे जातील, हे पाहण्यापासून ते राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार होईपर्यंतच्या अनेक घटनांमध्ये त्यांचा आत्तापर्यंत मोठा वाटा राहिला आहे. Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शपथविधी, सासूबाई माधवी पाटणकर यांना काय वाटतं? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
पक्षात कुठेही नाराजी नाही, दिल्लीतील बैठक नियोजित, सुनिल तटकरेंनी दिली महत्वाची माहिती, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
पक्षात कुठेही नाराजी नाही, दिल्लीतील बैठक नियोजित, सुनिल तटकरेंनी दिली महत्वाची माहिती, आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget