एक्स्प्लोर
दुचाकी चोरून तिचे सुटे भाग विकणारी टोळी जेरबंद
दुचाकी चोरून त्याचे भाग वेगळे करुन विकणाऱ्या एका टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी सात चोरीच्या दुचाकी, 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे दुचाकींचे सुटे भाग हस्तगत करण्यात आले आहेत.
मुंबई : शहर आणि उपनगरातील विविध भागातून दुचाकी चोरून त्याचे भाग वेगळे करुन विकणाऱ्या एका टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी सात चोरीच्या दुचाकी, 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे दुचाकींचे सुटे भाग हस्तगत केले आहेत. तसेच तिंघाना अटक करण्यात आली आहे.
चेंबूर पोलीस ठाण्यात एका दुचाकी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या दुचाकीचा पोलीस तपास करीत असताना त्यांना एका निळ्या दुचाकीला पिवळी बॉडी लावलेली आढळली. या दुचाकीचे काही भाग, बॉडी ही तक्रारदाराच्या चोरीला गेलेल्या गाडीचे असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरुन पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांना दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
तपास करत असताना पोलिसांनी सुरुवातीला स्कुटरचा मालक वसीम वकील अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने पाच हजार रुपये देऊन जाफर चौधरी या मॅकेनिक कडून बॉडी बसवून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जाफरला ताब्यात घेतले. जाफरकडे चौकशी केली असता त्याने मोहम्मद अन्सारी या मुलाच्या मदतीने दुचाकी चोऱ्या करून त्याचे भाग करुन काही भाग विकल्याचे सांगितले. तसेच भायखळा येथील जाकीर हुसेन सलमानी याच्याकडे गाडीच्या चेसी दिल्याचे कबूल केले.
या टोळीने चेंबूर, माहीम, गोवंडी, कुर्ला, माटुंगा धारावी, वडाळा, आर ए किडवाई मार्ग, टिळक नगर इत्यादी परिसरातून 11 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. यातील सात दुचाकी आणि त्यांचे भाग ज्याची किंमत अंदाजे 2 लाख 10 हजार आहे, ही सर्व मालमत्ता हस्तगत केली असून पुढील तपास चेंबूर पोलीस करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement