एक्स्प्लोर
लोकलमधून थुंकणं जिवावर बेतलं, मुंब्र्याच्या दोन तरुणांचा मृत्यू
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून थुंकण्यासाठी बाहेर डोकावताना तोल गेल्यामुळे दोन तरुणांनी जीव गमावला.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून थुंकण्यासाठी बाहेर डोकावताना तोल गेल्यामुळे दोन तरुणांनी जीव गमावला. लोकमधून पडल्यानंतर सरफराज समीर खान या 17 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र अमन सय्यद हा 19 वर्षांचा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सरफराज समीर खान, अमन सय्यद आणि त्यांचा अजून एक मित्र काल (25 जुलै) मुंब्र्याहून दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यात दर्शनासाठी येत होते. मुंब्र्याहून त्यांनी स्लो लोकल पकडली आणि नंतर घाटकोपर रेल्वे स्थानकावर उतरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी जलद लोकल पकडली.
प्रवासादरम्यान रात्री साडेनऊच्या सुमारास सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान सरफराज थुंकण्यास झुकला आणि त्याचा हात सुटून तोल गेला. तसंच लोकलच्या दरवाज्यात उभा असलेला मित्र अमन हादेखील पडून गंभीर जखमी झाला.
या दुर्घटनेत सरफराज जागीच ठार झाला, तर अमन सय्यदला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या दोघांसोबत अजून एक मित्र प्रवास करत होता,तो सुखरुप बचावला आहे. या सुखरुप असलेल्या मित्रानेच घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement