एक्स्प्लोर
सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा
या दोघांनी या तरुणाप्रमाणेच कल्याण-डोंबिवली, मुरबाड, शहापूर, कसारा परिसरात अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं.

कल्याण : सरकारी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कल्याणच्या एका नामांकित कॉलेजमधील एका प्राध्यापकासह शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका क्लार्कला अटक केली आहे. राजेश थोरात असं अटक केलेल्या आरोपी प्राध्यापकाचं नाव असून तो कल्याणच्या मोहिंदरसिंग काबुलसिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. तर या प्रकरणातील महेंद्र डांबरे हा दुसरा आरोपी शिक्षण उपसंचालक कार्यालयात क्लार्क म्हणून कार्यरत आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणाकडून या दोघांनी सरकारी नोकरी लावून देण्यासाठी सहा लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर संबंधित तरुणाला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं या तरुणानं पोलिसात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी थोरात आणि डांबरे या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या दोघांनी या तरुणाप्रमाणेच कल्याण-डोंबिवली, मुरबाड, शहापूर, कसारा परिसरात अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























