एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेता एजाज खानला अटक
एजाज खानने ड्रग्ज घेतले असून त्याने काही मुलींना हॉटेलमध्ये बोलावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता एजाज खानला अटक आज (23 ऑक्टोबर) करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज प्रकरणात एजाजला बेलापूरच्या के स्टार हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या. एजाज खानला आज दुपारी बेलापूर कोर्टात हजर केलं जाणार आहे.
एजाज खानने ड्रग्ज घेतले असून त्याने काही मुलींना हॉटेलमध्ये बोलावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही एक प्रकारे रेव्ह पार्टी असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. यानंतर पोलिसांनी हॉटेलमधील त्याच्या रुममध्ये छापा टाकला आणि त्याला अटक केली.
एजाज खानने रक्त चरित्र, नायक आणि या रब यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच बिग बॉसच्या सातव्या सीझनसह कॉमेडी नाईट विथ कपिल, करम अपना अपना, कहानी हमारे महाभारत की आणि रहे तेरा आशीर्वाद यांसारख्या मालिकांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement