एक्स्प्लोर
मुंबई लोकल : रेल्वेच्या तीनही मार्गांवर रविवारचा मेगाब्लॉक आज
पहाटे सहा वाजल्यानंतर रविवारी दिवसभर उपनगरीय लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर डागडुजी आणि देखभालीच्या कामांसाठी दर रविवार मेगाब्लॉक घेण्यात येतो. पण यावेळी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर आज (शनिवारी) मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्री एक ते रविवारी पहाटे सहापर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
पहाटे सहा वाजल्यानंतर रविवारी दिवसभर उपनगरीय लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीनंतर एक ते रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंडपर्यंत मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला/माहीमपर्यंत दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीनंतर 1.20 ते सकाळी 6.20 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
सीएसएमटी-वडाळा ते पनवेल-बेलापूर-वाशी मार्गावर पहाटे 4.32 ते स. 6.46 पर्यंत आणि पनवेल-बेलापूर-वाशी ते सीएसएमटीपर्यंत पहाटे 4.03 ते स. 5.59 पर्यंत सेवा खंडीत करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरीपर्यंत पहाटे 4.26 ते स. 6.21 आणि वांद्रे-अंधेरी ते सीएसएमटीपर्यंत पहाटे 5.13 ते स. 6.16 पर्यंत सेवा खंडीत राहतील. या मार्गावर सीएसएमटी-कुर्ला आणि कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवरही मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकापर्यंत दोन्ही मार्गांवर आज मध्यरात्रीनंतर 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्याच येईल.
मेगाब्लॉक दरम्यान विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा स्थानकात थांबणार नाहीत. तर चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल माहीम, माटुंगा, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी स्थानकात थांबणार नाहीत. या मेगाब्लॉकमुळे रात्री उशिरा प्रवास करताना प्रवाशांची काही प्रमाणात अडचण होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement