मुंबईत गोराई चौपाटीवर बैलगाडा शर्यतीचा थरार; पोलिसांना मात्र सुगावाच नाही, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
Mumabi News: मुंबईत गोराई चौपाटीवर रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार. पोलिसांना मात्र सुगावाच नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केला गुन्हा दाखल.
Mumabi News: एकीकडे बैलगाडा शर्यतींवर (Bailgada Sharyat) बंदी घातली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra News) बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) आणि तामिळनाडूतील (Tamil Nadu) जलिकट्टूवर बंदी घालण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयानं अद्याप निकाल राखून ठेवला आहे. पण दुसरीकडे, मुंबईत (Mumbai News) पार पडलेल्या बैलगाडा आणि घोडागाडी शर्यतीची मात्र चर्चा सगळीकडे रंगली आहे.
मुंबईतील (Mumbai News) बोरिवली पश्चिमेच्या गोराई चौपाटीवरील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुंबईत काल गुरुवारी सकाळी अचानक गोराई चौपाटीवर (Gorai Chowpatty) बैलगाडा आणि घोडागाडी शर्यत पार पडली. याची कुणकुण गोराई पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी या स्पर्धेच्या आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गोराई पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 6 वाजता बोरिवली पश्चिमेकडील गोराई समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडा आणि घोडागाडी शर्यतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील केली होती. मात्र या शर्यतीचा सुगावा पोलिसांना लागला नाही. शर्यत पाहायला आलेल्यांपैकी काही जणांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या शर्यतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गोराई पोलिसांनी आयोजकांविरुद्ध क्रुएल्टी टू एनिमल्स अॅक्ट, 1960 (Prevention of Cruelty to Animals Act) च्या कलम 11 नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत.
पाहा व्हिडीओ : Gorai Beach Bailgada Sharyat:मुंबईजवळ गोराई बीचवर बैलगाडा आणि घोडागाडी शर्यत
दरम्यान, मुंबईत बोरिवली पश्चिमेच्या बैलगाडा शर्यत सुरू असताना त्याचा आनंद घेण्यासाठी बाईक आणि कार स्वारांसह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पण, गोराई समुद्रकिनाऱ्यावरील या शर्यतीची चाहूल पोलिसांना कशी लागली नाही? याविषयी मात्र आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणाऱ्या आयोजकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :