एक्स्प्लोर
Advertisement
राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारली
राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता. पण अर्ज फेटाळला असल्याने ही सभा एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. शिवसेना, मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडीला मैदान मिळते पण राहुल गांधींसाठी सरकार परवानगी देत नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे .
मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेसाठी शिवाजी पार्कची परवानगी नाकारली आहे. राहुल गांधी यांच्या 1 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज फेटाळला आहे. म्हणून ही सभा एमएमआरडीए मैदानावर होणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.
राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता. पण अर्ज फेटाळला असल्याने ही सभा एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. शिवसेना, मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडीला मैदान मिळते पण राहुल गांधींसाठी सरकार परवानगी देत नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे .
राहुल गांधी हे गुजरातमधील कार्यकारणीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांची 1 मार्च रोजी धुळे आणि मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतील सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची जागा काँग्रेसकडून निश्चित करण्यात आली होती. मात्र याची परवानगी काँग्रेसला मिळालेली नाही. सगळ्यांना शिवाजी पार्क सभेसाठी मिळत ,मात आम्हाला का मिळत नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान चव्हाण यांनी यावेळी मनसेला महाआघाडीत घ्यायला काँग्रेसने स्पष्ट नकार कळवला असल्याचेही सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी मनसेला महाआघाडीत घ्यावे म्हणून प्रस्ताव ठेवला होता. पण काँग्रेसने मनसे बरोबर वैचारिक मतभेद आहेत. समविचारी पक्षांची आघाडी असावी असा महाआघाडीचा उद्देश आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत स्थान नाही असे स्पष्टपणे राष्ट्रवादीला कळवले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
नाशिक
Advertisement