एक्स्प्लोर

साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील

Jayant Patil : सेनेची स्थापना झाली तेव्हा माझे नेते पवार साहेबांनी कट्ट्यावर बसून भाषण ऐकलं होतं. मुंबईसाठी बाळासाहेब किती महत्त्वाचे होते हे त्यांना माहिती होतं, असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेला संबोधित केलं.  उद्धव ठाकरेजी तुम्ही उशिरा आलात पण आक्रमक आणि मुद्देसूद भाषण आदित्य ठाकरेंचं मी ऐकलं, मुंबईची नस, मुंबईला काय पाहिजे, मुंबईला काय हवंय याची ओळ नं ओळं आदित्य ठाकरेंना माहिती आहे. उद्धवजी मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे देऊन तुम्ही महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं, असं जयंत पाटील म्हणाले. 

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दामुळं मुंबई मराठी माणसाची ही भावना देशभर पसरली. ते होते या मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणे उभा राहिला हे महाराष्ट्रात कोणी विसरता कामा नये. आजच्या मंचावरील पोस्टर पाहून आनंद होतोय की भावकी एक झाली आहे. मुंबईत फिरलो लोकांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा लोकांना आनंद झाला आहे. शिवतीर्थ भरलेय पण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माणूस बघतोय याचा राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहतोय.  तुम्ही दोघं एकत्र आलात यासाठी शरद पवार यांच्यावतीनं अभिनंदन करतो. पवारसाहेब येणार होते पण त्यांना जमलं नाही, त्यांनी मला यायला सांगितलं, असं जयंत पाटील म्हणाले. 

आम्ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण टीव्हीवर पाहायचो. तेच मैदान आहे, तिच शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत, तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत. मला खात्री आहे की मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. 

19 जून 1966 ला या शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली, त्याच वेळी माझे नेते शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण इथल्याच एका कट्ट्यावर बसून ऐकलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्त्व मुंबईसाठी आवश्यक आहे ही भावना शरद पवार यांनी राज्यभर बाळगली आहे. हे मैदान आपल्या अभिमानाचं हे मैदान आहे. शरद पवार यांनी याच मैदानावरुन पक्षाची स्थापना केली होती, असं जयंत पाटील म्हणाले.

साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका, अशा अनेक गोष्टी आहेत. कालपरवा अण्णा मलाई येऊन गेले काय बोलले,त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाहीये. मुंबई पुन्हा तोडण्याचा डाव सुरु झालेला दिसतोय, त्यामुळं आपण सावध व्हायला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.  

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
Embed widget