एक्स्प्लोर

Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एका सभेत आज बोलणार आहेत, करून दाखवलेल्या कामावर आपणही निवडणूक लढवत आहोत.

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवरुन आज शिवशक्ती सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधूंची तोफ धडाडत आहे. येथील सभेत सर्वप्रथम मनसेच्या संदीप देशपांडे यांनी भाषण केलं, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार कधीही संपत नसतो, असे म्हणत देशपांडेंनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुरुतीलाच, ही निवडणूक गटर, वॉटर, मीटरची निवडणूक असून भाजप महायुतीचे नेते मोठ मोठी आश्वासने देत असल्याचं म्हटले. यावेळी, आदित्य यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मिमिक्री केली. विशेष म्हणजे, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा दाखलाही यावेळी त्यांनी दिला.

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एका सभेत आज बोलणार आहेत, करून दाखवलेल्या कामावर आपणही निवडणूक लढवत आहोत. भाजपच्या होर्डिंग वर 2 चेहरे आहेत, त्या चेहऱ्यांचं मुंबईसाठी योगदान काय? असा सवाल आदित्य यांनी विचारला. तसेच, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातला नेली कोणी? उद्योगधंदे गुजरातला कोणी नेली? हे त्यांचं योगदान आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष इथं आहे, तिकडे आहेत ते पक्ष नाहीत टोळ्या आहेत. मनसेचं बोलायचं तर राज ठाकरेंच्या डोळ्यात नाशिक बद्दल विशेष प्रेम दिसतं, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, यावेळी त्याच्या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत मला आजच्या सभेतही मुख्यमंत्र्‍यांची मिमिक्री करण्याचं अनेकांना म्हटलं आहे. त्यामुळे... म्हणत आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवरुनही देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री केली. आमची मुंबईत सत्ता येणार... मोदी साहेब भाजपचा जलवा दिसणार... आपली सत्ता येणार... असे मुख्यमंत्र्‍यांच्या स्टाईलने आवाज काढत आदित्य यांनी म्हटले. यावेळी, उपस्थितांनी टाळ्या वाजवत, हसून दाद दिली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा एका कॉर्नर सभेतीला व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यातही त्यांनी मुख्यमंत्र्‍यांची मिमिक्री केलीय.

फडणवीसांना टोला

आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात लाव रें तो फोटो म्हणत राज ठाकरेंची स्टाईल मारली, यावेळी राज ठाकरे माझे काका आहेत, थोडी लिबर्टी घेतो असेही ते म्हणाले. कोस्टल रोडचे भूमिपूजनचे फोटो तुम्हाला दाखवतो... देवेंद्र फडणवीस कुठे आहेत... आता फडणवीस तुम्हाला 3000 हजार रुपये देतो... लगेच देतो... दाखवा तुमचे फोटो कुठे आहेत? असे चॅलेंजच आदित्य यांनी फडणवीसांना दिले. तर, भाजपच्या अण्णामलाईला सांगतो... स्वतः तुमचा मतदार संघ बघा, तुमचं डिपॉझिट जप्त झालं आहे, आम्हाला सांगू नका मुंबई काय आहे? अशा शब्दात पलटवार केला. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणाचं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी भरभरुन कौतुक केलं. उद्धवजी आता तुम्ही महाराष्ट्र सांभाळायला मोकळे झालात, कारण मुंबईची खडान खडा माहिती असलेलं अतिशय चांगलं भाषण आदित्य यांनी केलंय, ते आता मुंबई सांभाळायला सक्षम आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची मोठी गर्दी

मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले असून घोषणाबाजी करत, वाजत गाजत कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क परिसर दुमदुमल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्वतः मुंबईतील बहुतांश शाखांमध्ये भेट देत आजच्या सभेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. आपल्या प्रत्येक शाखा भेटीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शिवतीर्थावर या, विरोधकांना मशालीने जाळायचं आहे, तुमच्याशी भरभरून बोलायचं आहे, असेही म्हटले होते. त्यामुळे, दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही आजच्या सभेसाठी उत्सुक होते.

हेही वाचा

Video: मोठी बातमी! पुण्यात देवाभाऊंचा रोड शो, स्वागताच्या फटाक्यांनी इमारतीला आग; मोबाईल टॉवर जळून खाक

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Embed widget