Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवरुन आज शिवशक्ती सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधूंची तोफ धडाडत आहे. येथील सभेत सर्वप्रथम मनसेच्या संदीप देशपांडे यांनी भाषण केलं, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार कधीही संपत नसतो, असे म्हणत देशपांडेंनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुरुतीलाच, ही निवडणूक गटर, वॉटर, मीटरची निवडणूक असून भाजप महायुतीचे नेते मोठ मोठी आश्वासने देत असल्याचं म्हटले. यावेळी, आदित्य यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मिमिक्री केली. विशेष म्हणजे, त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा दाखलाही यावेळी त्यांनी दिला.
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एका सभेत आज बोलणार आहेत, करून दाखवलेल्या कामावर आपणही निवडणूक लढवत आहोत. भाजपच्या होर्डिंग वर 2 चेहरे आहेत, त्या चेहऱ्यांचं मुंबईसाठी योगदान काय? असा सवाल आदित्य यांनी विचारला. तसेच, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातला नेली कोणी? उद्योगधंदे गुजरातला कोणी नेली? हे त्यांचं योगदान आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष इथं आहे, तिकडे आहेत ते पक्ष नाहीत टोळ्या आहेत. मनसेचं बोलायचं तर राज ठाकरेंच्या डोळ्यात नाशिक बद्दल विशेष प्रेम दिसतं, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, यावेळी त्याच्या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत मला आजच्या सभेतही मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करण्याचं अनेकांना म्हटलं आहे. त्यामुळे... म्हणत आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवरुनही देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री केली. आमची मुंबईत सत्ता येणार... मोदी साहेब भाजपचा जलवा दिसणार... आपली सत्ता येणार... असे मुख्यमंत्र्यांच्या स्टाईलने आवाज काढत आदित्य यांनी म्हटले. यावेळी, उपस्थितांनी टाळ्या वाजवत, हसून दाद दिली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा एका कॉर्नर सभेतीला व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यातही त्यांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री केलीय.























