एक्स्प्लोर

Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार

सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या कारणामुळे सध्या अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी  केलं. मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर : शरद पवार 

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराच आरोप आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरुन व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला." "धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. या संदर्भातील निर्णय पक्ष म्हणून करावा लागले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती या नेत्यांपुढे मांडणं. त्यांची मतं जाणून घेत पुढची पावलं लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ," असं शरद पवार म्हणाले.

नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिक आरोप नाहीत : शरद पवार 

दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. त्यावरुनही विरोधक नवाब मलिकांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याबाबत शरद पवार म्हणाले की, नवाब मलिक हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत.  त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले असून त्यांना संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. त्याचा तपास सुरु आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात आरोप नाहीत."

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचा जावई अटकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर करण सजनानीला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही एनसीबीने जप्त केला. करण सजनानीच्या चौकशीतून समीर खान यांचं नाव समोर आलं आहे. यासंदर्भात एनसीबीने समीर खान याची बुधवारी (13 जानेवारी) जवळपास दहा तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली.

संबंधित बातम्या

कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून तातडीनं निर्णय घेऊ : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले 
अस्थिर बाजारानं गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग,विक्रमी संख्येनं एसआयपी खाती बंद, डिसेंबरमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले
Embed widget