एक्स्प्लोर
मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची आज (गुरुवार) पहिली बैठक मंत्रालयात पार पडली.
![मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक The First Meeting Of The Cabinet Sub Committee On The Issue Of The Maratha Reservation Latest Update मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/22160602/chandrakant-patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची आज (गुरुवार) पहिली बैठक मंत्रालयात पार पडली.
बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याकरिता समितीतील सदस्यांना विषय वाटून देण्यात आले. या मागण्यांवर राज्य शासन गांभीर्याने कार्यवाही करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या मागण्यांवर राज्य सरकार विचार करत असल्याचे पाटील यांनी सांगितलं. यावेळी समितीचे सदस्य शिक्षणमंत्री विनोद तावडे, गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक, मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भातील विषयांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. तर मराठा आरक्षणासंदर्भात महसूल मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे पाठपुरावा करणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा समाजासाठी घोषित केलेल्या जिल्हानिहाय वसतीगृहासंदर्भात पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)