एक्स्प्लोर

ठाणे ते बोरिवली आता 20 मिनिटांवर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गर्भातून होणार दोन बोगदे

प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जातील. बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे.

मुंबई :  ठाणे ते बोरिवली (Boriwali to Thane)  23  किलोमीटरचे अंतर आता 20  मिनिटांवर येणार आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गर्भातून दोन भूमिगत बोगद्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता देण्यात आल्याची माहिती  एमएमआरडीए अध्यक्ष  संजय मुखर्जी  यांनी दिली आहे.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहन चालकांचा दीड तास वाचेल तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल

मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि ठाणे  जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या सदर प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहचमार्ग असा 13.05 मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे 12  किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे.

कसा आहे प्रकल्प?

प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43  किमी लांबीचा ही ठाणे जिल्ह्यातून तर 7.4  किमी लांबी ही बोरीवलीमधून प्रस्तावित आहे.

प्रकल्पाची किंमत 16600 कोटी

प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जातील. बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे. प्रकल्पाची किंमत ही सुमारे रुपये 16600 कोटी इतकी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा ही समावेश आहे. एकूण 46.57 हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, त्यात 35.53 हेक्टर सरकारी वन्य जमीन आहेत, तर उर्वरित जमीन चितळसर, मानपाडा, माजिवडा, मागाठाणे, बोरीवडे, चेने आणि येऊर या गावात आहेत.

गोखले पुलाचं 25 एप्रिलला लोकार्पण होणार

अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचे मागील अनेक महिन्यांपासून काम सुरु आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं काम सुरु होतं. नोव्हेंबर 2022 पासून गोखले पूल हा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.जून महिन्याच्या अखेरीस गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका (BMC) प्रयत्नशील होती. पुलाच्या बांधकामासाठी विशेष करून स्टील गर्डरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्याने कामात विलंब झाला असल्याचा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे ही वाचा :

BMC Budget 2024: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; 2024-25 साठी 59 हजार 954 कोटी रुपयांची तरतूद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget