एक्स्प्लोर
Advertisement
ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयी
ठाणे : ठाण्यात प्रचाराचा नारळ पत्नीवर भिरकावणारे शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील विजयी झाले आहेत. नारळ लागल्याने माणिक यांच्या पत्नी संगीता पाटील जखमी झाल्या होत्या. संगीता या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या.
प्रकरण काय आहे?
ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील प्रभाग 16 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी प्रभागातील उमेदवार माणिक पाटील, गुरुमितसिंग स्यान आणि डॉ जितेंद्र वाघ उपस्थित होते. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता पाटीलही त्यावेळी गेल्या. इतकी वर्ष कुठे होता असा प्रश्न पती माणिक पाटील यांनी करताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
ठाण्यात सेनेच्या उमेदवाराने प्रचाराचा नारळ पत्नीला भिरकावून मारला !
त्यानंतर माणिक पाटील यांनी पत्नी संगीता यांच्यावर प्रचाराचा नारळ भिरकावला. जखमी झालेल्या संगीता पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ठाण्याच्या श्रीनगर परिसरात प्रभाग 16 मधून शिवसेनेने माणिक पाटील यांना उमेदवारी दिली. तर विद्यमान नगरसेविका असलेल्या संगीता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. माणिक पाटील आणि संगीता पाटील या दाम्पत्यातील वाद सर्वांना परिचित आहे. त्यांचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement