एक्स्प्लोर

ठाणेकरांचा वेळ वाचणार, वाय जंक्शन उड्डाणपुलासह कळवा खाडीवरील पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा  होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Thane News: मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 4 रील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. या उड्डाण पुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा  होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले "एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या  उड्डाणपुलाचा हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा  होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. कल्याण डोंबिवली  महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारीकरण करण्याचे काम देखील लवकर सुरू होईल ज्यामुळे या भागातील नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते मिळतील तसेच इतर विकास कामामुळे आयुष्य सुखकर होईल.

प्रकल्पाची माहिती
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हा ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. हा महामार्ग मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा - कल्याण फाटा जंक्शन या भागातून जात असल्यामुळे त्या भागाचा विकास होत आहे. मुंब्रा वाय जंक्शनवरील एमएमआरडीएने बांधलेल्या ३+३ अशा दुहेरी मार्गिकेच्या या उड्डाणपुलामुळे जेएनपीटीकडून येणारी अवजड वाहतूक आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक विभक्त करते. त्यामुळे जेएनपीटी आणि गुजरातच्या सीमेवरून येणार्‍या अवजड कंटेनरच्या वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल उपयुक्त ठरेल.  तसेच मुंब्रा शहरातून येणाऱ्या स्थानिक वाहतुकीमुळे होणारी गर्दीदेखील टळेल.
 
तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण

ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला. पुढील मार्गिका एक डिसेंबर रोजी सुरू करण्याची घोषणाही केली. तसचे, या पुलाचा विस्तार पटनीपर्यंत करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही स्पष्ट केले. तीन हात नाका, माजीवडा जंक्शन येथेही लवकरच काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कळवा खाडी पुलाविषयी माहिती

· ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून ठाणे- बेलापूर मार्गे नवी मुंबईकडे जाण्यासाठी कळवा खाडीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे.

· या पूलाचे 93% काम पूर्ण झाले आहे. परंतु, या परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या पूलाच्या पोलीस कमिशनर ऑफिस ते कळवा चौक- बेलापूर रोड ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात येत आहे.

· कळवा खाडीवर एकूण तीन पूल आहेत. पहिला पूल ब्रिटिशकालीन असून तो 1863 मध्ये बांधला होता. 2010मध्ये त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली. ऑगस्ट 2016 मध्ये हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आला. तो आता वास्तू वारसा (हेरिटेज साईट) आहे.

· १९९५-९६ दरम्यान दुसरा कळवा खाडी पूल बांधण्यात आला. त्यावरूनच आतापर्यंत सर्व वाहतूक सुरू होती. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दोन्हीकडील चौकात वाहतूक कोंडी होत होती. म्हणून हा तिसरा पूल बांधण्यात आला आहे.

· तिसरा पूल २०१३ मध्ये प्रस्तावित करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या महासभेने 20 फेब्रुवारी 2014 रोजी त्यास मान्यता दिली. (ठराव क्रमांक -462). लगेच कार्यादेश देऊन काम सुरू करण्यात आले.

· नवीन पूलाची एकूण लांबी 2.20 कि.मी. असून पूलाकरिता एकूण 5 मार्गिका बांधण्यात आलेल्या आहेत.

· या पूलाचा एकूण प्रकल्प खर्च 183.66 कोटी इतका आहे.

· ठाणे कारागृहाजवळील मार्गिका डिसेंबर महिन्यामध्ये वाहतूकीस खुली करण्यात तयार होईल.

· उर्वरित साकेत कडील मार्गिका माहे मार्च 2023 पर्यंत वाहतूकीस पूर्ण तयार होऊन संपूर्ण पूल वाहतूकीस उपलब्ध होईल.

· संपूर्ण पूल माहे मार्च 2023 मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर कळवा, मुंब्रा आणि बेलापूरकडे जाणारी संपूर्ण वाहतूक पूलावरुन एकेरी मार्गाने जाईल आणि बेलापूर रोड कळवा, मुंब्रा कडून ठाणे शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे सध्या वापरात असलेल्या पूलावरुन एकेरी मार्गाने असेल.

· सदरचा पूल पूर्ण क्षमतेने माहे मार्च 2023 मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची संपूर्ण समस्या दूर होणार आहे.

· पुलावर येण्यासाठी पोलीस कमिशनर ऑफिस मार्गिका, जेल जवळील मार्गिका आणि साकेत कडून येणाऱ्या वाहनांकरिता वर्तुळाकार मार्गिका अशा तीन मार्गिका आहेत.

· पुलावरुन उतरण्यासाठी कळवा चौक आणि बेलापूर रोड अशा दोन मार्गिका आहेत.

· पुलावर ठाणे आणि कळवा दरम्यान शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पादचारी मार्गिकेची सुध्दा व्यवस्था असणार आहे.

· खाडीवरील पुलाची लांबी 300 मी.मी. असून त्यापैकी 100 मी. लांबीचा बास्केट हॅण्डल आकाराचा लोखंडी नेव्हीगेशन स्पॅन आहे. त्याला स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटर ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे स्पॅनच्या संरचनेच्या स्थितीबाबत दररोज मूल्यमापन होऊ शकेल.

· सदर नेव्हीगेशन स्पॅनला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून यामुळे पुलाच्या तसेच एकूणच शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget