Tejas Thackeray : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदारच असेल, आमदार अपात्रता प्रकरणावर तेजस ठाकरेंची प्रतिक्रिया
Tejas Thackeray : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे काही वेळात स्पष्ट होईल. त्याआधी तेजस ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीये.
मुंबई : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल असं म्हणत तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (MLA Disqualification Case) प्रतिक्रिया दिलीये. काहीचच वेळात स्पष्ट होईल. त्याआधी तेजस ठाकरेंची ही प्रतिक्रिया समोर आलीये. शिवसेनेच्या आमदार अपात्रेतेच्या प्रकणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे निकालाचे वाचन करणार आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार असून आता कोणता नवा भूकंप होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
आदित्य ठाकरेंनी देखील हा निकाल येण्याआधी प्रतिक्रिया दिली होती. यावर त्यांनी म्हटलं होतं की, पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्तवाचा आहे, डॉ. बाबाासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले आहे त्या संविधनाप्रमाणे गेले तर हे आमदार बाद झाले पाहिजे. जर निकाल वेगळा आला तर ते भाजपाचे वेगळे संविधान आहे असे वाटेल. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निर्णय घेणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं असेल.
ठाकरेंचा प्लॅन बी तयार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यास ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जर निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टात जाणं हा ठाकरेंचा प्लॅन बी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.
निकाल शिंदेंच्या बाजूने लागणार असल्याची सूत्रांची माहिती
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा शिंदेंच्या बाजूने आणि ठाकरेंच्या बाजूने लागणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्याचवेळी ठाकरे गट जर या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये याचीही खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या गोटातील चिंता वाढल्याचं दिसून येतंय.