एक्स्प्लोर
अंबरनाथमध्ये शिक्षकाकडून तिसरीच्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
प्रितेशला असह्य वेदना होऊ लागल्यानं खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र यानंतर अजूनही शिक्षक हरिबा चौघुलेवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाऱ्हेण गावात संताप व्यक्त होत आहे.
कल्याण : शाळेत मस्ती करतो, म्हणून शिक्षकाने तिसरीच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यात समोर आला आहे. प्रितेश पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव असून या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेण गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली. या विद्यार्थ्यांचा वाद सोडवल्यानंतर शिक्षक हरिबा चौघुले यांनी प्रितेश पाटील या विद्यार्थ्याला काठीने पाठीवर वळ येईपर्यंत अमानुषपणे मारहाण केली.
यानंतर प्रितेशला असह्य वेदना होऊ लागल्यानं खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र यानंतर अजूनही शिक्षक हरिबा चौघुलेवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाऱ्हेण गावात संताप व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement