एक्स्प्लोर
स्पेलिंग मिस्टेकमुळे नोकरी गमावलेल्या सफाई कामगारांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
नावात स्पेलिंग मिस्टेक झाल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरुन कायमस्वरुपी नोकरी नाकारली गेल्याबाबतची बातमी एबीपी माझानं लावून धरली होती. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना अखेर न्याय मिळाला. नावात झालेल्या चुका सुधारुन नोकरीवरुन काढून टाकण्याची नोटीस मागे घेऊन सफाई कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एबीपी माझाने ही बातमी लावून धरली होती.
‘माझा इफेक्ट’
नावात स्पेलिंग मिस्टेक झाल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरुन कायमस्वरुपी नोकरी नाकारली गेल्याबाबतची बातमी एबीपी माझानं लावून धरली होती. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
क्षुल्लक कारणावरुन सफाई कामगारांना कामावरुन काढलं!
दररोज मुंबईचा कचरा साफ करणाऱ्या तब्बल 1400 सफाई कामगारांना स्पेलिंग मिस्टेक झाल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणांवरुन महापालिकेनं कामावरुन काढून टाकण्याच्या नोटीस दिल्या होत्या. तर, 44 सफाई कामगारांना कायम करुन काही दिवसांतच नोकरीवरुन तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
नावात झालेल्या चूका सुधारुन नोकरीवरुन काढून टाकण्याच्या नोटीस मागे घेऊन सफाई कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आज कचरा वाहतूक श्रमिक संघटनेसोबत झालेल्या बैठकीत येत्या तीन महिन्यात या सफाई कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, त्यांना नोकरीवरुन काढून टाकल्यानंतरची संपूर्ण थकबाकी देण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
मुंबई महापालिकेच्या कामगारांचा नेमका प्रश्न काय होता?
कोर्टानं कायमस्वरुपी सफाई कामगांर म्हणून 2700 कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या सफाई कामगारांना मान्यता दिली होती. 2700 पैकी 1600 कामगारांची कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी पडताळणी झाली. 1600 पैकी 1400 कामगारांना आता स्पेलिंगमध्ये चुका सापडल्याच्या कारणावरुन नोकरीवरुन काढलं गेलं.
या प्रत्येक कामगाराची पालिकेकडे कायमस्वरुपी कामगार म्हणून पाच ते सहा लाखांची थकबाकी आहे. ही संपूर्ण थकबाकी चुकवणं आणि नोकरीवरुन काढून टाकलेल्या कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement