एक्स्प्लोर

Lalit Patil Arrested : इकडे ललित पाटीलचे गौप्यस्फोट, तिकडे सुषमा अंधारेंनी वात पेटवली, दुसऱ्या नेत्याचंही नाव घेतलं!

Lalit Patil Arrested : ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत (Lalit Patil) दादा भुसे आणि शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांची देखील नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंकडून पुन्हा आरोप

Sasoon Hospital Drug Racket : पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil Drug Case) बेड्या ठोकल्यानंतर त्याने गौप्यस्फोटांची मालिका सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मी ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital) पळालो नाही मला पळवलं गेलं असा स्फोटक दावा ललित पाटीलने केला. याआधी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर आरोप करत, ललित पाटील प्रकरणात दादा भुसे यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर आता ललित पाटीलच्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत (Lalit Patil) दादा भुसे आणि शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांची देखील नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. 

सुषमा अंधारेंचे यापूर्वीचे आरोप 

दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले होते. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात (Sasoon Hospital Drug Racket) मंत्री दादा भुसे (dada bhuse) यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा दावा सुषमा अंधारेंनी 13 ऑक्टोबरला केला होता. या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असंही त्या म्हणाल्या होत्या. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, पुरावे लवकरच समोर आणणार, असा दावा अंधारेंनी केला होता. 

ससूनच्या माजी डीनचे रेकॉर्डही तपासण्याची मागणी 

दादा भुसे यांची चौकशी करा तसेच पुण्याच्या ससूनचे माजी डीन काळे, ससूनचे लॅन्डलाईन यांचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करा. तसेच ललित पाटील कोण हे मला माहित नाही असे भूसे सांगतात, पण ललित पाटील यांना मातोश्रीवर दादा भूसे घेऊन आले होते, हे खोटे आहे का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला होता.

रवींद्र धंगेकरांचे आरोप

दरम्यान, काँग्रेसचे पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वात आधी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन, ससून ड्रग्ज प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप केला होता. ललित पाटीलच्या पळून जाण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. पण सुषमा अंधारे यांनी धंगेकरांच्या आरोपानंतर थेट दादा भुसे यांचं नाव घेतलं होतं.  

दादा भुसे काय म्हणाले होते?

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले होते.

ललित पाटीलचा गौप्यस्फोट (Lalit Patil Claim)

दरम्यान, ललित पाटील याला बंगळुरुत बेड्या ठोकून पोलिसांनी त्याला मुंबईत आणलं. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेताना, ललित पाटीलने 'माझा'च्या कॅमेऱ्यासमोर मोठे दावे केले. "मी पळालो नाही, मला पळवण्यात आलं. याप्रकरणात कुणाकुणाचा हात आहे,  हे मी लवकरच सांगणार" असं ललित पाटील म्हणाला. 

ललित पाटीलला बेड्या 

ललित पाटील (Lalit Patil) हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तीन पथकं तयार केली होती. पुणे पोलिस (Pune Police)  ललितच्या मागावर असताना साकीनाका पोलिस (Sakinaka Police Mumbai) ललित पाटीलसाठी  सापळा रचत होते.  साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात  ललित पाटील अलगद जाळ्यात फसला. 

ललित पाटीलच्या भावाला अयोध्येत पकडलं

दरम्यान, यापूर्वी पुणे पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil) आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला उत्तर प्रदेशातील आयोध्येजवळून ताब्यात घेतलं होतं. ललित पाटील ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेदेखील पसार झाले होते. भूषण पाटील हा केमिकल इंजिनियर आहे. त्याने मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याचं काम करत होता.  भूषण पाटील मेफेड्रॉन तयार करायचा, अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा तर ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा. 

ललित पाटील ससूनमधून पळाला

ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार असलेला ललित पाटील हा पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. 2 ऑक्टोबरच्या रात्री ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. ललित पाटील हा अमली पदार्थांची तस्करी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 1 ऑक्टोबरला ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे आमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ललित पाटील पसार झाला होता.

पाहा व्हिडीओ : Sushma Andhare on Drugs Exclusive: ललित पाटील, भूषण पाटील यांच्यापर्यंत सगळं थांबत नाही, तर पुढे...

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lalit Patil Arrested: मला ससूनमधून पळवण्यात कोणाकोणाचा हात सगळं सांगणार; जेरबंद ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget