एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर, नव्या राजकीय चर्चांना उधाण
सध्या भाजपात पक्ष प्रवेशाचे जोरदार वारे वाहत असून विरोधी पक्षांना मोठी गळती लागली आहे. अशा परिस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थान हे सर्व राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे.
मुंबई : सध्या भाजपात पक्ष प्रवेशाचे जोरदार वारे वाहत असून विरोधी पक्षांना मोठी गळती लागली आहे. अशा परिस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थान हे सर्व राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे काही खासगी कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर गेले होते. मात्र त्यावेळेस नुकतेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले वैभव पिचड, चित्रा वाघ (राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष), आमदार संदीप नाईक यांची त्याठिकाणी बैठक सुरु होती. सुनील तटकरेंच्या एंट्रीने हे सर्व जण काही क्षणांसाठी अवाक झाले होते.
पक्षप्रवेशाच्या माहौलात आपल्या नावाची विनाकारण चर्चा नको, म्हणून सुनील तटकरेंनी क्षणाचाही विलंब न लावता बंगल्यातून तात्काळ काढता पाय घेतला. मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले. तसेच राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चंद्रकांत पाटलांच्या दारात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement