एक्स्प्लोर
Advertisement
तांत्रिक मान्यतेची वाट न पाहता शिवस्मारकाचं काम सुरु करा, सरकारचे आदेश
प्रत्यक्ष काम 24 ऑक्टोबरला सुरू होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे. 1 मार्च 2018 पासून 36 महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना L&T कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट अॅग्रिमेंटमध्ये होत्या.
मुंबई : तांत्रिक मान्यतेशिवाय अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्पाचं काम 19 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश L&T कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष काम 24 ऑक्टोबरला सुरू होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे.
1 मार्च 2018 पासून 36 महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना L&T कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट अॅग्रिमेंटमध्ये होत्या. मात्र तांत्रिक समितीची मान्यता नसल्याने स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी साडे सात महिन्यांनी मुदत वाढली. काम सुरू होण्याआधीच स्मारकाची किंमत 643 कोटींनी वाढली आहे.
काय आहे तांत्रिक समिती?
तांत्रिक समिती या प्रकल्पाची उंची, लांबी, समुद्रातील खाऱ्या पाण्यात आणि आर्द्रतेत किती टिकाव धरेल, अशा नेक तांत्रिक बाबी तपासण्यासाठी नेमण्यात आली आहे. मात्र या समितीकडे मूळ डिजाईनमध्ये झालेल्या बदलांचा प्रस्तावच सादर करण्यात आलेला नसल्याने त्याची मान्यता अजून प्रलंबित आहे. एप्रिल 2017 नंतर या समितीची बैठकच झालेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारकाची तांत्रिक समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये 14 अधिकारी आणि तज्ञांचा समावेश आहे.
कसं असेल शिवस्मारक?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला देण्यात आलं आहे. प्रकल्पासाठी विविध विभागांकडून एकूण 12 ना हरकत दाखले मिळाले होते.
शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किमी आणि नरिमन पॉईंटपासून 2.6 किमी अंतरावर आहे. 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल असा दावा सरकारकडून करण्यात आलाय.
या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. पण अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. भूमीपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे उपस्थित होते.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement